Friday, 16 February 2024

मायेचा खांदा

माणूस कितीही खंबीर असला तरी एकदा त्याला दुसऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करावसं वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१६ फेब्रुवारी २०२४

Tuesday, 13 February 2024

शाळा

शाळा

जीवाला त्रास होतो तेव्हा
शाळा, फळा आठवू लागले
निवांतपणा शोधण्यास मन
शाळेत जाऊन बसू लागले

स्पर्धेच्या युगात जगताना
कपाळावर चिंता भारी आहे
हातावर घेतलेल्या छड्यांचा
मी खूप खूप आभारी आहे

शाळेचा निरोप घेतल्यानंतर
परिस्थितीने बरंच शिकवलं
जगाचा सामना करण्यासाठी
शिक्षकांनी शाळेतच घडवलं

क्षणोक्षणी पदरात पडलेल्या
ज्ञानाचा मी मोठा धनी आहे
ताठ मानेनं जगणं शिकलो
शिक्षकांचा मी ऋणी आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ फेबुवारी २०२४

Wednesday, 7 February 2024

छंद

आपलीच नाती आपल्यावर नेहमी नाराज असतात. म्हणून छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा. कारण नात्यापेक्षा आपला छंद आपल्याला दुःखातून बाहेर यायला मदत करतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ फ्रेबुवारी २०२४

Thursday, 1 February 2024

स्त्री चा अपमान

एखादी व्यक्ती जेव्हा स्त्री चा अपमान करते तेव्हा ती व्यक्ती हे विसरलेली असते की त्याने सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ फेब्रुवारी २०२४