Monday, 1 March 2021

आठवणी

आठवणी 

नात्यांचं काय सांगावं कुणाला 
आपली आपल्यावर रूसतात
एकटापणा असला कितीही
सोबतीला आठवणी असतात 

आठवणी आणि माझं नातं
उपमा देऊ कशाची याला!
गळून पडे जीव जेव्हा कधी
नेहमी बळ मिळे जगण्याला 

नजरेसमोर चेहरा हा असतो
सहवासातील क्षण आठवतात 
सहवासातल्या आठवणीमुळे
दुरावे फार कमी जाणवतात 


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१

No comments:

Post a Comment