विचार मनातील
विचारांच्या लहरी ठरवते
जगणं आपलं आयुष्यातील
आपल्याच हाती सारं आहे
मार्ग ठरविणं जगण्यातील
विचार म्हणजे सर्व काही
त्यावर घडत असे पुढचे
विश्वास असे स्वतः वर
जवळ भासे यश दुरचे
मनात खेळ नित्याने चाले
चांगल्या वाईट विचारांचा
विचारांच्या विचारावर असे
संकेत आपण असण्याचा
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ नोव्हेंबर २०२०
No comments:
Post a Comment