सहज माझे शब्दांशी
जुळलं आहे छान नातं
रंगती गप्पा मुक्त जेव्हा
गाणं तेव्हा तयार होतं
भासत नाही एकटेपण
मिळता दुःखाचा आहेर
एक शब्दच मित्र माझा
सहज व्यथा येते बाहेर
आहे जादू वेगळी त्यात
नाती सारी जपायची
कागदावर सजतो तेव्हा
दिशा दाखवतो जगायची
यल्लप्पा कोकणे
२७ जानेवारी २०१९
No comments:
Post a Comment