स्वागत करूया चला, गणराज आला माझा।।
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।धृ।।
पाहून रूप साजरे, आनंदी मन हे झाले
तुझ्याच भक्तीमध्ये, देवा भक्त सारे डोले
माझ्या लाडक्या बाप्पाचा, भारीच गाजा वाजा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।१।।
जीव वेडावला तुजसाठी, देवा काय आपली नाती
दर्शन घेतो मी तुझे रे, आज हाती घेऊन पंचारती
कृपा देवा तुझी आहे, झाला संसार सुखाचा माझा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।२।।
या रे या भक्तानो या रे, गीत बाप्पा चे गाऊ चला रे
आनंदी सोहळा पाहूया, गजरात ढोलाच्या नाचू चला रे
बाप्पा सेवेत तुझ्या आज, हरवून गेला देह माझा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑगस्ट २०१८
No comments:
Post a Comment