अभिमान आहे बोलतो मराठी
वाचतो मराठी ऐकतो मराठी
सेवा मराठीची करीत घडतो
हृदयात फक्त जपतो मराठी
माय मराठी माझी भाषा
सांगतो मी जगाला गर्वाने
आहे लाभले भाग्य मोठे
वाहते रक्तात तीच वेगाने
दिले झोकून स्वतःला आता
नांदते कवेत माझ्या मराठी
झाले संस्कार माझ्यावर सदा
रूजते कलेत माझ्या मराठी
अर्पितो तनमन मराठीस सारे
गर्व आहे मराठी असण्याचा
नसात भिनली मराठी आता
हर्ष आहे अस्मिता जपण्याचा
प्राण ओतून जपतो मराठी
श्वासात संचार करते मराठी
गोडवा मराठीचा गातो आहे
ध्यासात सदा राहते मराठी
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१८
No comments:
Post a Comment