करून मोलाचे मतदान आमचं
दिले नेत्याला आम्ही निवडून।।
पद मोठं इतकं कि त्यांना
दिसत नाही आम्ही तिकडून।।१।।
निवडून आल्यावर नेता हा
मनाचा कारभार करत आहे।।
गरीबांकडे दुर्लक्ष करून सारे
आपलीच झोळी भरत आहे।।२।।
विचार करून दिलेले मतदान
नेहमीच चूकीचं ठरत आहे।।
कोणावर विश्वास दाखवायचा?
प्रश्न हा, घर मनात करत आहे।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ सप्टेंबर २०१७
No comments:
Post a Comment