Friday, 15 September 2017

देव पाहिजेच कशाला?

वाजे घंटा मंदिरात रोज
जागे करण्यास देवाला
विश्वास ठेवला स्वतःवर
मग देव पाहिजेच कशाला?

नको मनात अंधश्रद्धा
नकोच खोटी भक्ती
दाखव रे भक्ता जगाला
तुझ्या मनातली शक्ती

होतो धंदा पुजार्‍यांचा
भोळ्या भक्तांना लुबाडून
कधी कळणार भक्ताला?
कोण सांगणार समजावून?

यल्लप्पा सटवाजी कोकणे

No comments:

Post a Comment