दगड मन
आपल्या माणसांची मनं
लवकर का कळत नाही?
त्यांच्या वागण्याचा अंदाज
आजही का लागत नाही?
आजकाल आपली मनं ही
कोणाशीही का जूळत नाही?
त्रासलेलं दुःखी मन आपलं
कोणालच कसं कळत नाही?
जाऊ लागले तडे नात्याला
संशयात ती टिकत नाही
दगड मनाच्या माणसांत
पालवी का फुटत नाही?
आयुष्य संपले दुसर्यासाठी
कोणीही कसं जाणत नाही?
स्वतःकडे ही लक्ष देण्यास
वेळ का कधी मिळत नाही?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जुलै २०१७
No comments:
Post a Comment