वेदना माझ्या पाहून जा
उभा मी रोजच्या वळणावर
आज तरी तू येऊन जा।।
नकळत घेतलेलं काळीजं
माझं मला देऊन जा।।१।।
खोटा बहाणा का पहाण्याचा?
मनातलं सारं सांगून जा।।
मनात उसळणाऱ्या वादळाला
येऊन जरा शांत करून जा।।२।।
घायाळ झालेल्या काळजावर
हळूच फुंकर मारून जा।।
काळजावर केलेल्या जखमांच्या
वेदना माझ्या पाहून जा।।३।।
वाट नेहमी पाहतो तुझी
घालमेल जीवाची पाहून जा।।
तुजसाठी लिहिलेली कविता
शांत बसून ऐकून जा।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मार्च २०१७
उभा मी रोजच्या वळणावर
आज तरी तू येऊन जा।।
नकळत घेतलेलं काळीजं
माझं मला देऊन जा।।१।।
खोटा बहाणा का पहाण्याचा?
मनातलं सारं सांगून जा।।
मनात उसळणाऱ्या वादळाला
येऊन जरा शांत करून जा।।२।।
घायाळ झालेल्या काळजावर
हळूच फुंकर मारून जा।।
काळजावर केलेल्या जखमांच्या
वेदना माझ्या पाहून जा।।३।।
वाट नेहमी पाहतो तुझी
घालमेल जीवाची पाहून जा।।
तुजसाठी लिहिलेली कविता
शांत बसून ऐकून जा।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मार्च २०१७
No comments:
Post a Comment