Saturday, 3 December 2016

वरूणराजाचे आगमन

वरूणराजाचे आगमन

ऐश आरामात जगती माणसे,
निसर्गाची विल्हेवाट लावून.
पाऊस पडला नाही म्हणून,
शेतकरी घेतो जीवन संपवून.

वाचवा सर्वांचा शेतकरी राजा,
घ्या हे मनावर कोरून.
पिकवतो धान्य आपल्यासाठी तो,
स्वतः काबाडकष्ट करून.

वरूणराजाचे आगमन होणार,
म्हणून मन प्रसन्न आहे.
कसा बरसेल कोणावर ?
हेच एक प्रश्न चिन्ह आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ मे २०१५

No comments:

Post a Comment