तापत आहे धरणी
रोज गजबजलेल्या नदीचे
सुकले आहे काठ।।
थांबून गेली रेलचेल
सर्वांनी फिरवली पाठ।।१।।
भेगा वाढत आहे
हरवली सुपीकता जमिनीची।।
पाणी नाही बंधर्यात
चिंता वाढली शेतकर्याची।।२।।
घेतला निरोप गारव्याने
तापत आहे धरणी।।
भागवण्यास तहान पक्षी
फिरे शोधीत पाणी।।३।।
निष्ठूर झाला सुर्य
ठेकळं गेली सुकून।।
हिरवं स्वप्न पाहण्यास
पाणी आणायचं कोठून।।४।।
दिली होती आश्वासने
झाली कोरडी आता।।
पाहण्यास हाल शेतकर्याचे
फिरकत नाही नेता।।५।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ फेब्रुवारी २०१६
No comments:
Post a Comment