अवनीला हिरवळीत नटवून कधी
पाऊस जातो मनाला सुखावून।।
पूर दुर्घटना घडता जेव्हा
हाच पाऊस जातो दुखावून।।१।।
शेतकर्यांच्या डोक्यावर सदा
असतो नेहमीच मायेचा हात।।
धोधो बरसून वैरासारखे कधी
हाच पाऊस करतो घात।।२।।
शाप आहे की वरदान
काय म्हणावे या पावसाला।।
पीक-पाणी कधी मृत्यूचे तांडव
अंदाज लागत नाही जगण्याला।।३।।
भय भलतेच मनाला वाटे
जीव मुठीत धरून जगताना।।
निसर्गासमोर पत्करली हार
पुरता हरलो निसर्ग समजताना।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ ऑगस्ट २०१६
No comments:
Post a Comment