Sunday, 4 December 2016

पाऊस म्हणजे?

पाऊस म्हणजे?

पाऊस म्हणजे
उल्हास मनी दाटलेला,
निसर्गाच्या सानिध्यात
मन वेडा फुललेला।

पाऊस म्हणजे
चौफेरे दाटलेली हिरवळ,
क्षणात दूर करते
मनात आलेली मरगळ।

पाऊस म्हणजे
उत्साह शरीरात दाटलेला,
रखडलेली कामे करण्यास
बोनस वेळ मिळालेला।

पाऊस म्हणजे
उगाच सुट्टी मिळालेली,
विसरून चिंता कामाची
कुटूंबासोबत घालवलेली।

पाऊस म्हणजे
चिखलाचाच राडा सारा,
उग्रट दर्प हवेत अन्
वाटेभर कचरा पसारा ।

पाऊस म्हणजे
नदिला आलेला पूर,
घरात साचलेलं पाणी अन्
मुलांच्या रक्षणाची हुरहुर।

पाऊस म्हणजे
फक्त पाऊसच आहे,
जितके लिहावं त्यावर
तितके कमीच आहे।

पाऊस म्हणजे
शब्दांची सरच बरसते,
खोलवर मनात रूतलेली
सहजच कविता खुलते।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जून २०१५

No comments:

Post a Comment