घुसमट
जिकडे जावे तिकडे घुसमट
प्रत्येक ठिकाणी ताबा राजकारण्यांचा।
स्वतःची तिजोरी भरतात नेहमी
येथे जीव जातो सामान्यांचा।।
साखळी त्यांची आहे मोठी
टेबलाखालून पैसे घेणार्यांची।
मदत मागण्यास जाता कधी
झिजणे वाढवी जोड्यांची।।
कधी उगवणार सुर्य सत्याचा?
भ्रष्टाचार रूपी अंधार पळविण्यास।
पाठव देवा दूत भुतलावरती
गरीबांची सुटका अंधारातून करण्यास।।
वाढते जेव्हा घुसमटीचे राज्य
आधार घेतो नेहमी शब्दांचा।
कागदावर उतरवता व्यथा मनाची
वाचकांनाही दिसे अनुभव स्वतःचा।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ जानेवारी २०१६
No comments:
Post a Comment