प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चिंतेत गुरफटलेला असतो, आणि ती चिंता वाढतच जाते. मात्र मनावर ताबा ठेवला आणि विचार सुंदर ठेवले, तर वयाचं भान विसरून बिनधास्त जगता येतं.
प्रत्येकाला स्वतःची मतं असतात. जी व्यक्ती स्वतःची मतं मांडू शकत नाही, ती दुसऱ्याच्या दबावाखाली वावरत असते. दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारा माणूस कधीच यशस्वी होत नाही.
छत्तीस गुण जुळले आहेत या विचाराने काही दिवस संसार व्यवस्थित चालतो. पण जेव्हा वादविवाद घडायला लागतात, तेव्हा पत्रिकेवर दोष न देता जोडीदारातील गुण शोधता आले पाहिजेत.