Saturday, 30 August 2025

निवांत क्षण

निवांत क्षण घालवण्यासाठी जगाशी संपर्क तोडला होता. तेव्हा लक्षात आलं की आपण नेहमी ज्यांची विचारपूस करत होतो, त्यांनी मात्र आपल्याला विचारलंही नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑगस्ट २०२५

Friday, 29 August 2025

आपले विचार

कळत-नकळत आपले विचार आपल्या आयुष्याला वळण देत असतात. आपले विचारच आपली दिशा ठरवतात. सरळ की खडतर वळणावर आपल्याला चालायचं आहे, हे आपल्या विचारांवरच अवलंबून असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑगस्ट २०२५

Thursday, 14 August 2025

औपचारिकता

जन्मानंतर आपला जीवनप्रवास सुरू होतो आणि तो स्मशानापर्यंत पोहोचल्यावर थांबतो. या प्रवासादरम्यान नातेवाईक फक्त औपचारिकतेपोटी आपल्या सोबत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑगस्ट २०२५

Tuesday, 12 August 2025

औषधी इलाज

एखाद्या गोष्टीचं दडपण आलं किंवा त्रास झाला, तर मित्रांमध्ये जाऊन गप्पा मारत बसावं. कारण मित्र कसाही असला तरी त्याच्या प्रत्येक शब्दात औषधी इलाज असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ ऑगस्ट २०२५

Wednesday, 6 August 2025

विरोधकांचे वेळापत्रक

आपण केलेल्या कामामुळे आणि रचलेल्या रणनीतीमुळे विरोधकांचे वेळापत्रक बदलले पाहिजे, असे धाडस आपल्यात असायला हवे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ ऑगस्ट २०२५