Friday, 28 February 2025

सत्याची बाजू

चुकीचं काम करून आयुष्यभर चिंतेत ग्रस्त राहाण्यापेक्षा सत्याच्या बाजूने राहून क्षणभर का होईना आनंद मिळविण्याचा प्रयत्न असावा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ मार्च २०२५

Thursday, 27 February 2025

बदलती परिस्थिती

बदलत्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ फेब्रुवारी २०२५

Tuesday, 25 February 2025

विचारांचा पसारा

घरात पसारा वाढला की तो आपल्याला आवडत नाही. आपण लगेच वस्तू जागच्या जागी ठेवतो. मग मनात विचारांचा पसारा कशाला हवा. सर्वच गोष्टींचा एका वेळी विचार करू नये. विचारांचा पसारा वाढला की सुटसुटीत असलेलं जगणं सुद्धा बंधिस्त वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ फेब्रुवारी २०२५

Saturday, 22 February 2025

वेळ

आपण मनगटावर घड्याळ जरी बांधले असेल तरी वेळेला बांधून ठेवू शकत नाही. वेळेनुसारच आपल्याला वागावं लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ फेब्रुवारी २०२५

Tuesday, 18 February 2025

चौकट

साऱ्याच गोष्टी चौकटीत राहून साध्य होत नाही त्यासाठी चौकट ओलांडून जगाच्या संपर्कात यावं लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ फेब्रुवारी २०२५

Saturday, 15 February 2025

आपल्यावर रुसण्याचा अधिकार

आपल्यावर कोणी रुसले असतील तर त्याचा राग मानू नये कारण आपल्यावर रुसण्याचा अधिकार फक्त आपल्याच माणसांचा असतो. परकियांची आपल्यावर रुसण्याची हिंमतच होणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ फेब्रुवारी २०२५

Thursday, 13 February 2025

जवाबदार

कोणालाही दोष द्यायचा नसतो कारण आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याला आपण स्वतः आणि आपले विचार जवाबदार असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ फेब्रुवारी २०२५

Tuesday, 4 February 2025

प्रेत

जीवंत असताना खांद्याला खांदा लावून एकमेकांना साथ देणं कोणाला जमत नाही पण स्मशानाच्या दिशेने चालत असताना हजारो सोबती असतात आणि आपण चौघांच्या खांद्यावर प्रेत होऊन पडलेलो असतो. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०४ फेबूवारी २०२५

Sunday, 2 February 2025

पर्याय

प्रत्येक वेळी पर्याय असतात. मन आपल्या ताब्यात असेल तर त्या पर्यायाचा योग्य उपयोग होतो पण जेव्हा मन ताब्यात नसेल किंवा आपण गोंधळलेले असतो तेव्हा सारे पर्याय आपल्या नजरेआड होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ फेब्रुवारी २०२५