Sunday, 26 January 2025

जाणीव

दुसर्‍यांच्या दुःखाची जाणीव असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थिती स्वतः आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना हे माहीत असतं की या जगात स्वतः पेक्षा जास्त दुःखी असणारे व्यक्तीही आपल्याच सभोवती असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ जानेवारी २०२५

Friday, 24 January 2025

योग्यता

दुसऱ्यांशी वाद न घालता त्यांच्या वागण्यात आपण समाधानी असायला हवं. असं केल्याने समोरच्या माणसांची योग्यता आपल्या लक्षात येते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जानेवारी २०२५

Thursday, 23 January 2025

पालापाचोळा

झाडापासून निखळलेल्या पानाला हवा सुद्धा साथ देत नाही. ज्याने झाडावर ज्या पानाला डोलवलं तीच हवा त्या पानाला पालापाचोळा पर्यंत पोहचविते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ जानेवारी २०२५

Wednesday, 15 January 2025

बहिरं होऊन जगावं

यश मिळेपर्यंत बहिरं होऊन जगावं म्हणजे आपण घेतलेले निर्णय कदाचित बदलणार नाहीत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ जानेवारी २०२५

Tuesday, 14 January 2025

कणखर

माणसाला जेव्हा रडावसं वाटतं पण अश्रू गळण्या अगोदर त्याला स्वतःच्या मर्यादा आठवतात तेव्हा समजावं की तो माणूस आतून सावरलेला असतो आणि तो अजून कणखर झालेला असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१४ जानेवारी २०२५

Monday, 13 January 2025

संकट

संकट आलं की त्या संकटाचे आभार मानले पाहिजे कारण संकटात आपल्या माणसांचे खरे चेहरे समोर येतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ जानेवारी २०२५

Sunday, 12 January 2025

विश्वास

विश्वासावर जग सुरू असलं तरी स्वतःवर विश्वास असेल तर आपण जगाला ही जिंकू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ जानेवारी २०२५

Saturday, 11 January 2025

शिक्षणाचं महत्त्व

लहाणपणी शिक्षणाचं वय असताना शिक्षणाला महत्त्व दिल्यास मोठेपणी आपलं महत्व वाढतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ जानेवारी २०२५

इच्छा मरत असताना

आपल्या इच्छा मरत असताना कोणाच्या तरी आशा पल्लवीत होत असतात. आपण केलेल्या त्यागामुळे दुसऱ्यांचं जीवनही बदलू शकतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ जानेवारी २०२५

Friday, 10 January 2025

त्याग

आपल्या इच्छा मरत असताना कोणाच्या तरी आशा पल्लवीत होत असतात. आपण केलेल्या त्यागामुळे दुसऱ्यांचं जीवनही बदलू शकतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० जानेवारी २०२५

Thursday, 9 January 2025

जागृत माणूस

कानाच्या दारातून शब्दाने प्रवेश करताच ते सुख किंवा दुःख घेऊन येतात. यातील कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला बाहेर काढायचं हे ज्याला कळतं तोच माणूस खरा जागृत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०९ जानेवारी २०२५

Saturday, 4 January 2025

मर्यादा

आपल्या स्वतः च्या वागण्याच्या मर्यादा लक्षात आल्यावर अडचणीत वाढ होत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०५ जानेवारी २०२५

वेळेची किंमत

वेळेच्या आधी काहीच मिळत नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही साध्य होत नाही. काही साध्य करायचं असेल तर सर्व गोष्टी वेळेवर होणे गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०२४

Thursday, 2 January 2025

मनाची घालमेल

लोकं आपल्याला ऐकवून निघून जातील आणि ते निवांत राहतील. आपल्या मनाची घालमेल वाढविण्यापेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करायचं आणि बाकीचं सोडून द्या.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ जानेवारी २०२५