Tuesday, 31 December 2024

भ्रम

सत्यता पडताळून पाहण्याचं धाडस करू नये. आपण जितकं भ्रमात राहू तितकंच आपण आनंदी राहत असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२५

समजदार व्यक्ती

समजदार व्यक्ती कधीच कोणावर नाराज होत नाहीत ते स्वतःचीच समजूत काढतात आणि शांत राहतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ डिसेंबर २०२४

Sunday, 29 December 2024

जीवाची घुसमट

जीवाची घुसमट होत असताना मन शांतीचा मार्ग सापडत नसेल तर आपल्या मनाच्या विरुद्ध कधीही जाऊ नये कारण आपले मन जे सांगतो तेच आपल्या भल्यासाठी असतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३० डिसेंबर २०२४

स्वतःची सावली

जेव्हा आपला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा आपण आपल्याच सावलीलाही घाबरत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ डिसेंबर २०२४

Friday, 27 December 2024

चेहऱ्या मागचे चेहरे

चेहऱ्या मागचे चेहरे ओळखता आले की आपली फसवणूक होत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२४

विज्ञान

विज्ञानाने एक नियम सांगितला आहे कि ताणलं कि तुटतं. म्हणून आपण जास्त ताणत नाही. पण नात्यात सर्व नियम मोडीत काढले जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ डिसेंबर २०२४

Wednesday, 25 December 2024

जवाबदारी

जबाबदारी वाढली की मनासारखं जगणं राहून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ डिसेंबर २०२४

Tuesday, 24 December 2024

लाकूड

माणूस जिवंत असताना लाकडावर अन्न शिजवून जगतो आणि तेच लाकूड मरणानंतर चिता होऊन आत्मा मुक्तही करतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ डिसेंबर २०२४

अडचणी

अडचणी आयुष्याचा एक भाग आहे आणि अडचणींना सामोरं जाणं ही एक कला आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ डिसेंबर २०२४

Sunday, 22 December 2024

अडथळे

आपले स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या स्वप्नांची कुठेही चर्चा करू नये कारण अडथळे निर्माण करणारे टपलेले असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०२४

प्रगतीच्या आड

प्रगतीच्या आड जो कोणी येतो त्याला कापून बाजूला केलं जातं मग ते व्यक्तिगत असो वा सामाजिक.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०२४

Friday, 20 December 2024

परखडपणे

परखडपणे विचार मांडलेला कागद फाडून पायाखाली तुडविला जातो आणि खोट्याने वागणाऱ्याला डोक्यावर घेऊन मिरवले जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ डिसेंबर २०२४

पुस्तकं

पुस्तकं रस्त्यावर मिळत असली तरी ती पुस्तकं वाचल्यावर माणूस उंच भरारी मारण्यास सज्ज होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०२४

Saturday, 14 December 2024

पंखात बळ

आभाळ सर्वांसाठी मोकळं असतं फक्त तिथपर्यंत पोहचण्यासाठी पंखात बळ असायला हवं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ डिसेंबर २०२४

Sunday, 8 December 2024

अश्रू

सुखात खूप जगावसं वाटतं आणि दुःखात सर्व थांबल्यासारखं वाटतं पण अश्रू सुखात आणि दुःखात निरंतर वाहतच असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ डिसेंबर २०२४

Saturday, 7 December 2024

लोकांचा टोमणा

बिनधास्त जगायचं असेल तर लोकांच्या टोमणांकडे लक्ष द्यायचं नसतं. आपला धीर कधी सुटतोय हेच विरोधक लक्ष ठेवून असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ डिसेंबर २०२४

Thursday, 5 December 2024

जीवंत असूनही

आपल्या हातून झालेल्या काही चुका सुधारून आपण नवीन आयुष्य सुरू करू शकतो पण काही चुका अशा असतात की आपण जीवंत असूनही आयुष्य थांबल्यासारखं वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ डिसेंबर २०२४

Tuesday, 3 December 2024

पश्चात्ताप आणि अपयश

बराच वेळा असं होतं की आपला मेंदू दुसऱ्यांच्या विचारांवर चालत असतो. याचा परिणाम शेवटी पश्चात्ताप आणि अपयश मिळतं. म्हणून जरी आपण दुसऱ्याचं ऐकत असलो तरी आपल्याला आपल्या मनाला योग्य वाटेल ते करावं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ डिसेंबर २०२४

Monday, 2 December 2024

ओंजळभर सुख

ओंजळभर सुख आणि मायेची भूक यासाठी धडपडणारी व्यक्ती नेहमी प्रामाणिक असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ डिसेंबर २०२४