Saturday, 30 November 2024

ज्ञानात भर

"मला हे माहीत आहे" असं एखादयाचं म्हणणं थांबवून बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घ्यावं. कदाचित त्याच्या बोलण्याने आपल्या ज्ञानात भर ही पडू शकते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ डिसेंबर २०२४

विशाल मन

समुद्राएवढे विशाल मन असणाऱ्या कडे जर आपली तहान भागत नसेल तर ते विशाल मन काय कामाचं. या जगात बिनशर्त मदत करणारे फार कमी आहेत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० नोव्हेंबर २०२४

Thursday, 28 November 2024

यशस्वी होणारी माणसं

यशस्वी होणारी माणसं स्वतः केलेलं नियोजन कोणालाही सांगत नाही. वेळ आली की फक्त आपलं कर्तव्य बजावत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ नोव्हेंबर २०२४

Tuesday, 26 November 2024

भूतकाळातल्या गोष्टी

भूतकाळातल्या गोष्टीचा जो विचार ही करत नाही तो आनंदाने भरभरून जगत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ नोव्हेंबर २०२४

Sunday, 24 November 2024

ओठांवरती कर्ज

ओठांवरती कर्ज असल्यासारखं वागू नये. बिनधास्त संवाद साधला की जगणं मोकळं होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ नोव्हेंबर २०२४

मोठं यश

आपण जितकं जास्त संयमी राहू तितकं मोठं यश संपादन करू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ नोव्हेंबर २०२४

Saturday, 23 November 2024

दुसऱ्यांचे टोमणे

जगण्याचा आनंद लुटायचा असेल तर दुसऱ्यांच्या टोमण्यांकडे लक्ष द्यायचं नसतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ नोव्हेंबर २०२४

Friday, 22 November 2024

सुख कोणत्या गोष्टीत आहे?

"सुख कोणत्या गोष्टीत आहे?" हे आपल्या लक्षात आल्यावर आपण जगाला विसरून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ नोव्हेंबर २०२४

Thursday, 21 November 2024

अस्वस्थता

अस्वस्थता इतकी तीव्र असली पाहिजे की त्या अवस्थेला पाहून यश आपल्याकडे धावून यायला हवं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ नोव्हेंबर २०२४

जीवन जगताना

जीवन जगताना खडतर प्रयत्न करून मिळालेला आनंद आणि रात्रीची शांत झोप ही गरीबीतही श्रीमंत असल्याची जाणीव करून देते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ नोव्हेंबर २०२४

Wednesday, 20 November 2024

आपल्याकडून चुकलेले

आपल्याकडून चुकलेल्या गोष्टींचा विचार करून त्यात गुंतायचं नसतं. ती गोष्ट दुरुस्त करता येत असेल तर ती करावी आणि नवीन जगात रमण्याचा प्रयत्न करावा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० नोव्हेंबर २०२४

Tuesday, 19 November 2024

सराव

आपण जितका जास्त सराव करू तितका जास्त अचूकपणा आपल्या कोणत्याही कामात दिसू लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० नोव्हेंबर २०२४

वेळेची किंमत

वेळेच्या आधी काहीच मिळत नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही साध्य होत नाही. काही साध्य करायचं असेल तर सर्व गोष्टी वेळेवर होणे गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०२४

Sunday, 17 November 2024

एक संधी

आपल्या शिवाय कुठलेही काम थांबत नाही. परिस्थिती आपल्याला फक्त एकदा संधी देते. त्याचा फायदा घेतला नाही तर ती पुढच्या व्यक्तीकडे जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ नोव्हेंबर २०२४

Saturday, 16 November 2024

नवरा बायकोचं नातं

पारदर्शक संसार होण्यासाठी नवरा बायकोचं नातं हे मैत्रीत रूपांतर होणे गरजेचे असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ नोव्हेंबर २०२४

चिकाटी

कामात जितकी चिकाटी असेल तेवढंच यश आपल्याला चिटकून राहतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ नोव्हेंबर २०२४

Friday, 15 November 2024

साधी माणसं

आपल्याला गरज नसतानाही ज्ञान पाजळणारी माणसं पावलो पावली भेटतील परंतू आपण शांत असल्यावर आपल्या चेहऱ्यावरी भाव वाचणारे साधी माणसं शोधूनच सापडतील.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ नोव्हेंबर २०२४

Thursday, 14 November 2024

स्वतःपासून दूर

माणसं जेव्हा आपल्याला आवर्जून भेटायला येतात तेव्हा खूप आनंद होतो पण जेव्हा आपण स्वतःपासून दूर जातो तेव्हा ते सर्वात मोठा दुःख असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ नोव्हेंबर २०२४

Tuesday, 12 November 2024

प्रवास

आपण फक्त मार्ग दाखवायचा असतो. प्रवास करायचा की तिथेच थांबून राहायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ नोव्हेंबर २०२४

Monday, 11 November 2024

वेळेनुसार बदल

वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते. आणि बदलणे गरजेचे असते. आपला स्वभावही वेळेनुसार बदलला पाहिजे तरच आपण हवं ते साध्य करू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ नोव्हेंबर २०२४

Friday, 8 November 2024

आनंदाचे रंग

आयुष्यात काही घटना आनंदाचे रंग उधळून जाताना तर काही न मिटणारे डाग देऊन जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ नोव्हेंबर २०२४

Thursday, 7 November 2024

हजारो खांदे

माणसाने इतकं प्रामाणिक जगावं की आपण मेल्यानंतर ही हजारो खांदे पुढे सरसावले पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ नोव्हेंबर २०२४

Wednesday, 6 November 2024

दुःखाला कुरवाळत बसलं की

दुःखाला कुरवाळत बसलं की सुख जवळ येत नाही. ते नाराज होऊन आपल्याला न भेटता पुढे निघून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ नोव्हेंबर २०२४

Monday, 4 November 2024

यशाची उंच भरारी

बालपणी चौकटीत राहून व पालकांच्या शिस्तीच्या धाकात जगलेली मुलं मोठे झाल्यावर यशाची उंच भरारी घेतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ नोव्हेंबर २०२४

माणसांची मनं

दिवस उगवतो आणि मावळतो. यात काहीही बदल होताना दिसत नाही आणि आपण म्हणतो खूप काही बदललं आहे. याचं कारण हेच की येथे "माणसांची मनं" फार बदलली आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ नोव्हेंबर २०२४

Saturday, 2 November 2024

वेळेचा फायदा

वेळ निघून गेली की त्या वेळेची किंमत कमी होते. पण त्या वेळेचा फायदा आपण करून घेतला तर आपली किंमत वाढते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ नोव्हेंबर २०२४

ज्वालामुखी

कधीच कोणाचा अंत पाहू नये. हिरवळीने नटलेल्या पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखी असतोच ना!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ नोव्हेंबर २०२४

Friday, 1 November 2024

मान सन्मान

फुलाने कधीच गर्व करू नये कारण फुलाला हातात घेण्याकरीता प्रथम देठाला स्पर्श करावा लागतो. म्हणून आपलं कतृत्व नेहमी मोठं ठेवा. मान सन्मान सहज मिळतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४

जीवाचा आटापिटा

ओरडून किंवा जीवाचा आटापिटा करून हक्क दाखवण्यापेक्षा गोड बोलून मन जिंकता आली पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४

आकर्षण आणि प्रेम

आकर्षण आणि प्रेम यात मोठं अंतर आहे. आकर्षण बेचैनी वाढवतो आणि प्रेम जगायला भाग पाडतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४