नात्यात अडकलेलं एक उत्तम उदाहरण म्हणजे, मुलं लहान असताना आई वडील त्यांचा सांभाळ करतात आणि तीच मुलं मोठी झाल्यावर वृद्ध आई वडीलांना लहान मुलांप्रमाणे सांभाळतात.
बाहेरच्या जगातील आपल्याच माणसांची मनं दुखवून घरात चार भिंतीत राहणाऱ्या चार माणसांची मनं जपावी लागतात. कारण आयुष्य वाहून नेताना बाहेरच्या व्यक्तीपेक्षा घरातील हक्काच्या व्यक्तीची आदरयुक्त भीती हे करण्यास भाग पाडते.
मनातून उतरलेली व्यक्ती कालांतराने आपल्याशी खरं वागण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या खऱ्या वागण्याचा आदर करताना व त्यांच्यावर विश्वास ठेवताना नकळत खूप प्रश्न निर्माण होतात!