Sunday, 28 July 2024

संयम

परिस्थिती सर्वांचा मार्ग बदलत असते पण जो आलेल्या परिस्थितीचा सामना करून संयमाने स्वतःचा मार्ग निवडतो तोच यशस्वी होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जुलै २०२४

Saturday, 27 July 2024

श्वास

श्वास

आयुष्य किती शिल्लक आहे
हे श्वास, सांग तू मला जराशी
तुझाच भरवसा आहे म्हणूनी
स्वप्ने बाळगून आहे मी उराशी

जगलो नाही मी स्वतःसाठी
दुसऱ्यांचा आनंद जपताना
लोकांना नेहमी पाहतो आहे
फक्त स्वार्थ साधून जगताना

जीवन मृत्यूचे अंतर वाढू दे
बरेचसे लक्ष गाठायचे आहे
श्वास, तू रोखू नकोस मजला
मुलांचे संसार थाटायचे आहे

शेवट मी सत्य जाणतो एकच
श्वास, तुझा कुठलाही धर्म नाही
हे सारं कमावलेलं क्षणार्धात
सोडून जावं लागेल सर्व काही

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जुलै २०२४

Monday, 22 July 2024

मनाचा आवाज

इतरांचे बोलणे ऐकून आपले स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा मनाचा आवाज ऐकावा. असे केल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ जुलै २०२४

Tuesday, 16 July 2024

संशय

आपली चुक नसताना कोणाचे बोलणे ऐकून घेत प्रतिउत्तर दिले नाही तर आपल्याकडे संशयाने पाहणाऱ्यांच्या संखेत वाढ होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जुलै २०२४

Sunday, 14 July 2024

अपेक्षा भंग

आपण स्वतः लोकांशी कसे वागतो हे पहिलं तपासून पहावे व नंतर लोकांकडून अपेक्षा कराव्यात. असे केल्याने अपेक्षा भंग कमी होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ जुलै २०२४