Tuesday, 30 April 2024

जन्म आणि मृत्यू झाल्यावर

आपण जन्माला आल्यावर किंवा आपला मृत्यू झाल्यावर कोणी आनंदी असतं तर कोणाला दु:ख होतं. त्यावेळेस हे स्वतःला माहीत नसतं. याचा विचार करून त्रास करून घेऊ नये. कारण वेळ आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० एप्रिल २०२४

Sunday, 28 April 2024

आग ओकणारा सूर्य

दिवसभर आग ओकणारा सूर्य संध्याकाळी प्रसन्न वाटतो. माणसाचं ही तसंच आहे. आपला माणूस रागावला तर काही वेळ आपण शांत रहावं. आपण काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर राग लवकर शांत होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ एप्रिल २०२४

Thursday, 25 April 2024

कर्तव्य

आपण आपली जबाबदारी झटकल्यावर जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर समजून घ्या की तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यास तुम्ही कमी पडत आहात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०२४

Wednesday, 17 April 2024

सोपं असलेलं काम

आपल्याला न समजल्यामुळे किंवा मुळापासून विचार न केल्यामुळे सोपं असलेलं काम अवघड होऊन बसतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ एप्रिल २०२४

सोपं असलेलं काम

आपल्याला न समजल्यामुळे किंवा मुळापासून विचार न केल्यामुळे सोपं असलेलं काम अवघड होऊन बसतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ एप्रिल २०२४

Friday, 12 April 2024

गणगोत

आपले दुःख विसरून दुसऱ्यांचा विचार करणाऱ्यांचे गणगोत आणि मित्र परिवार जास्त असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ एप्रिल २०२४

Thursday, 11 April 2024

विश्वास

जेथे विश्वास गैरहजर असतो तेथेच प्रश्न उपस्थित होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ एप्रिल २०२४

Wednesday, 10 April 2024

अभ्यासू वृत्ती आणि दूरदृष्टी

अभ्यासू वृत्ती आणि दूरदृष्टी ह्या दोन गोष्टी अंमलात आणून त्यावर सकारात्मक कार्य केल्यास आपलं महत्व जगाला पटवून देता येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ एप्रिल २०२४

Sunday, 7 April 2024

इमानदारी आणि जबाबदारी

इमानदारी आणि जबाबदारी या दोन्हीं गोष्टींची जाणीव असेल तर माणसाला कुठल्याही गोष्टीत अडचणी निर्माण होत नाही. 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ एप्रिल २०२४

Friday, 5 April 2024

शांत माणूस

माणूस काही बोलत नाही म्हणून हलक्यात घेऊ नये. शांत असलेला माणूसच खूप जड जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ एप्रिल २०२४

Tuesday, 2 April 2024

अपेक्षा भंग

आपल्यात समजूतदारपणा कमी असेल तर अपेक्षा भंग होण्याची शक्यता जास्त असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ एप्रिल २०२४