Wednesday, 31 January 2024

निर्मळ स्वभाव

पैसे तर कोणत्याही मार्गाने व हिमतीने सारेच कमवतात पण माणूस कमवायला फक्त निर्मळ स्वभाव लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
 ३१ जानेवारी २०२४

Wednesday, 24 January 2024

दृष्टिकोन

माणसाचा दुसऱ्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरून त्याचा स्वभाव लक्षात येतो. झाडाखाली रस्त्यावर पडलेल्या फुलांना कोणी पायदळीत तुडवतो तर कोणी उचलून घेऊन त्याचा सुगंध घेतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जानेवारी २०२४

Monday, 15 January 2024

जीभेवर रेंगाळलेला

कानात जर कोणी विष भरले असेल तर नेहमी जीभेवर रेंगाळलेला माणूस दाताखाली येतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जानेवारी २०२४

Thursday, 11 January 2024

नवा स्पर्श

नवा स्पर्श

नवा स्पर्श जाणवला सखीचा
नजरही तिची बोलकीच होती
प्रेम व्यक्त करण्याची वाट जणू
खऱ्या अर्थाने मोकळीच होती

जीवाला "निवांत" भेटला कधी
आठवणींच्या गावात रमून जातो
माझी नजर शोधते नेहमी तिला
तिच्याच विचारात हरवून जातो

श्वास घेणं गरजेचं असतं तसे
विचारात सखीच्या जगतो आहे
काळजाचं दुःख स्वतःस ठाऊक
तिचा दुरावा फार सलतो आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ जानेवारी २०२४