Sunday, 31 January 2021

वेळेवर मिळण्यासाठी

वेळेच्या आधी कोणाला काही मिळत नसले तरी वेळेवर मिळण्यासाठी आधी प्रयत्न करणे आवश्यक असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ जानेवारी २०२१

प्राण

कोणतीही गोष्ट आयुष्यभर जिवंत ठेवायची असेल तर वर्तमान काळात त्यात प्राण ओतले पाहीजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ जानेवारी २०२१

विचारांचे वादळ

जितकी शांतता असेल तितकाच घडाळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्याच प्रमाणे मनातील विचारांचे वादळ जितके कमी वाहतील तितकाच ध्येयाचा किनारा लवकर सापडतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०२१

Tuesday, 26 January 2021

चांगली माणसं

आयुष्यात चांगली माणसं पेरली की चांगल्याच  विचारांची देवाणघेवाण करून प्रगती करता येते.

 यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जानेवारी २०२१

Saturday, 23 January 2021

सकारात्मक दृष्टिकोन

एखादं कार्य पूर्ण होत असताना एक वेगळाच उत्साह व ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होत असते याचं कारण एकच असतं ते म्हणजे पूर्ण होणाऱ्या कामाची सुरूवात ही सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जानेवारी २०२१

Thursday, 21 January 2021

स्वतःशी संवाद

विश्वासाने स्वतःशी संवाद साधणे म्हणजे प्रत्येक कार्यात स्वतःची प्रगती करणे होय.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ जानेवारी २०२१

Wednesday, 6 January 2021

व्यक्तीचे मनातील स्थान

आपल्या मनात एखाद्या व्यक्तीचे घट्ट स्थान असेल तर काहीही झालं तरी ती व्यक्ती कधीच दुरावली जात नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जानेवारी २०२१