Friday, 31 May 2019

पानगळ

पानगळ झाली म्हणून झाड कधीच मुळांचा वैरी होत नाही किंवा त्यावर रागवतही नाही. साथही सोडत नाही. कारण त्या झाडाला माहीत असतं की वेळ आल्यावर झाडाला बहर नक्की येणार.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ मे २०१९

Thursday, 30 May 2019

जाणिव

स्वतः मध्ये गुरफटलेल्या व कोणाचाही विचार न करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या घरात व समाजात घडणाऱ्या गोष्टींची काहीच जाणिव नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ मे २०१९

Wednesday, 29 May 2019

माणूस माणसात जिवंत राहतो

मेल्यानंतरही माणूस माणसात जिवंत राहतो तो म्हणजे त्याच्या चांगल्या वाईट  स्वभावामुळे. शरीराची साथ सुटल्यावर  मागे आपल्या स्वभावाची चर्चा फार होत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ मे २०१९

Friday, 24 May 2019

जगणं

जगाला धरून चालल्यावर
जगात असल्यासारखं वाटतं
एकांत असला मनात तर
जगणं नसल्यासारखं वाटतं

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०१९

समाज नाती

दूरून आलेल्या प्रियेला
नाही भेटलो मी एकांती
जवळची आपलीच सारी
आडवी होती समाज नाती

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०१९

Monday, 20 May 2019

विचार

एखाद्या व्यक्तीचा बदललेला स्वभाव हा आपल्या मनात संशयाला खतपाणी घालत असतो. अशावेळी त्या व्यक्तीला काय साध्य करायचं आहे हे कळत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की, आपलं नातं टिकून रहावं म्हणून हा समोरच्या व्यक्तीचा आटापिटा असतो. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेस वाद न घालता शांत राहिल्याने नाती घट्ट होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०१९