Showing posts with label प्रेरणादायी विचार. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी विचार. Show all posts

Thursday, 6 August 2026

स्मशानात आपल्या शरीरासोबत

दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून मनात दडवलेल्या वेदना आणि न बोललेल्या गोष्टी शेवटी स्मशानात आपल्या शरीरासोबत राखेतच मिसळून जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०६ ऑगस्ट २०२६

Monday, 20 July 2026

घराला घरपण येण्यासाठी

चार भिंती आणि एक छप्पर असलं म्हणजे घर होत नाही. घराला घरपण येण्यासाठी त्यात जिव्हाळ्याची माणसं असावी लागतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२० जुलै २०२६

Friday, 10 July 2026

नशीब नावाची गोष्ट

नशीब नावाची गोष्ट नसते. आपल्या प्रयत्नांनाच लोक नशीब म्हणतात. एखादं ध्येय गाठायचं ठरवलं की, ते मिळेपर्यंत केलेला प्रत्येक प्रयत्नच यशाचा पाया रचत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१० जुलै २०२६

Thursday, 2 July 2026

करून तरी बघ!

"करून तरी बघ!"
मनातून आलेला हा एक छोटासा आवाज अनेक मोठ्या यशांची सुरुवात ठरतो. माणसांनी पहिलं पाऊल उचलण्याचं धाडस करावं. रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि यश तुमच्या दिशेने चालत येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०२ जुलै २०२६

Sunday, 28 June 2026

तो मित्र नसतो

आपली गरज संपताच जो मित्र शत्रूशी हातमिळवणी करतो, तो मित्र नसतो, तो भविष्यातील सर्वात मोठा धोका असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२८ जून २०२६

Saturday, 13 June 2026

यश अपयशाचा पाया

आपल्या विचारांवर आणि कृतींवरच आपल्या यश-अपयशाचा पाया उभा असतो. त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पाहून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१३ जून २०२६

Tuesday, 9 June 2026

आयुष्यात काही बिघडतं

जेव्हा आपल्या आयुष्यात काही बिघडतं, तेव्हा आपण रागावतो आणि त्यासाठी दुसऱ्यांना दोष देतो. पण मुळात कोणत्याही कामाची सुरुवात आपण आपल्या विचारांनुसार आणि निर्णयांनुसारच करत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०९ जून २०२६

Saturday, 6 June 2026

यश सर्वांनाच मिळते

यश सर्वांनाच मिळते, फक्त सकारात्मक दृष्टिकोन आणि कामामध्ये सातत्य असणे आवश्यक असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०७ जून २०२६

Monday, 1 June 2026

यश मिळविण्यासाठी

अपयश हाच आपला खरा गुरु असतो, कारण पुन्हा यश मिळवण्यासाठी लागणारे धडे तोच आपल्याला शिकवून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०१ जून २०२६

Sunday, 24 May 2026

आयुष्यातील अनेक गोष्टी

आपल्यामुळे काहीही बिघडणार नाही, याची काळजी घेतली तर आयुष्यातील अनेक गोष्टी आपोआप सुरळीत होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२४ मे २०२६

Friday, 22 May 2026

एकाग्रता

एकाग्रता हीच यशाची खरी गुरुकिल्ली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२२ मे २०२६

Saturday, 16 May 2026

अदृश्य शक्ती

मनात येणाऱ्या विचारांमागे आणि आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कार्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते. आपण मात्र केवळ निमित्त असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०८ मे २०२६

Saturday, 2 May 2026

स्वप्नं थांबतात

सुरक्षित राहणं खूप सोपं असतं, पण तिथेच स्वप्नं हळूहळू थांबतात. धाडस केलं तरच पुढे जाता येतं आणि त्यातच यशाचं खरं रहस्य दडलं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०२ मे २०२६

Friday, 1 May 2026

मोह

मोह आवरता आला नाही, तर आपण भावनेच्या भरात वाहून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०२ मे २०२६

Thursday, 23 April 2026

जवळची माणसं

एक-दोन भेटींमध्येच काही माणसं जवळची वाटतात, पण काही वेळा आयुष्यभर जवळ असणारी माणसं ओळखताही येत नाहीत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२३ एप्रिल २०२६

Monday, 20 April 2026

मृत्यूनंतर

आपण आपल्या माणसांसाठी आणि जगासाठी जगलो असलो, तरी शेवटी आपलीच माणसं आपल्या मृत्यूनंतर आपल्याला स्मशानात जाळतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२० एप्रिल २०२६

Friday, 17 April 2026

अस्तित्व

आपल्याशिवाय कोणाचं काहीही अडत नाही. जग इतकं वेगाने धावत आहे की आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा कोणालाही काहीही फरक पडत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१७ एप्रिल २०२६

Thursday, 16 April 2026

अहंकार

आपल्याला एखाद्या ठिकाणी कमीपणा जाणवत असेल, तर तो स्वीकारावा लागतो. यात जर आपला अहंकार आडवा येत असेल, तर तो आपला पराजय आहे. कमीपणा स्वीकारून काही दिवस त्या कामापासून दूर राहावं. कालांतराने ज्यामुळे आपल्याला कमीपणा जाणवला, त्याची चूक लोकांच्या लक्षात येते आणि आपण पुन्हा लोकांना योग्य वाटू लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१६ एप्रिल २०२६

Monday, 13 April 2026

तळमळ

जे पुरुष बायकांचं ऐकत नाहीत, त्यांनी ऐकायला सुरुवात करावी. कारण त्यांच्या प्रत्येक विचारामागे संसार सुखाचा आणि सुरळीत व्हावा हीच तळमळ असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१३ एप्रिल २०२६

Wednesday, 8 April 2026

खोटं बोलणारे

खोटं बोलणारे भीती आणि दडपणाखाली जगत असतात. त्यांना खूप विचार करून वागावं लागतं. त्यांच्या हातून नकळत बऱ्याच चुका होण्याची शक्यता असते. खरं बोलणारे मात्र एकदम बिनधास्त जगतात. ते आपलं म्हणणं सहज बोलून मोकळे होतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०८ एप्रिल २०२६