Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

Sunday, 23 April 2017

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा....

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा....

झाली "सतरा" वर्षे पूर्ण आता
एकत्र संसार करता करता।।
एकमेकांची मनं राखलीत तुम्ही
सुख दुःखात जगता जगता।।१।।

संभाळून आपली जवाबदारी
जिंकलात तुम्ही एकमेकांना।।
ठेवलीत तुम्ही जपून नाती
सामोरं जाता रोज आव्हानांना।।२।।

सुख दुःखात एकत्र नांदत
मजबूत केला पाया संसाराचा।।
मागतो मागणं देवाला मी
रोजच असो क्षण आनंदाचा।।३।।

परमेश्वरा, काहीच नको कमतरता
माझ्या "देशनेहरे" साहेबांच्या संसारात।।
आजच्या सारखे साहेब तुम्ही
रोजच घ्या जगून आनंदात।।४।।

सुख समाधान राहो नेहमीच
हिच आहे आमची इच्छा।।
आमच्याकडून तुम्हां दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा।।५।।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ एप्रिल २०१७

Tuesday, 20 December 2016

बाळाचे आगमन

इवल्याशा पावलांनी आता
घर अंगण सजणार
जगाला विसरून सारे
बाळात आता रमणारा

शुभेच्छा तुम्हाला देतो
स्वागत बाळाचे करताना
तुम्हीही भुलणार आता
डोळ्यांत स्वप्ने जपताना

तुमच्या मनात होता
बाळाच्या आगमणाचा ध्यास
आजचा क्षण आणि दिवस
आहे तुमच्यासाठी खास

आनंदातही आज जणू
आसमंत फूलून जातो
बाळाला शुभ आशिर्वादासह
शुभेच्छा तुम्हाला देतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०१६