Monday, 20 July 2026

घराला घरपण येण्यासाठी

चार भिंती आणि एक छप्पर असलं म्हणजे घर होत नाही. घराला घरपण येण्यासाठी त्यात जिव्हाळ्याची माणसं असावी लागतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२० जुलै २०२६

Friday, 10 July 2026

नशीब नावाची गोष्ट

नशीब नावाची गोष्ट नसते. आपल्या प्रयत्नांनाच लोक नशीब म्हणतात. एखादं ध्येय गाठायचं ठरवलं की, ते मिळेपर्यंत केलेला प्रत्येक प्रयत्नच यशाचा पाया रचत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१० जुलै २०२६

Thursday, 2 July 2026

करून तरी बघ!

"करून तरी बघ!"
मनातून आलेला हा एक छोटासा आवाज अनेक मोठ्या यशांची सुरुवात ठरतो. माणसांनी पहिलं पाऊल उचलण्याचं धाडस करावं. रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि यश तुमच्या दिशेने चालत येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०२ जुलै २०२६