Thursday, 22 July 2021
देवा विठ्ठला
Sunday, 17 November 2019
मन माझं जडलेलं
Thursday, 8 November 2018
आठवणीत तुझ्या मी
आठवणीत तुझ्या मी राहतो दिन राती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।धृ।।
जीव हा बघ तुझ्यात गुंतला।।
भास हा तुझाच होई मजला।।
विसरू जगास साऱ्या जोडू प्रेमाची नाती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।१।।
नजरेचे इशारे आता लाख झाले।।
काळजात प्रिये खोल वार झाले।।
गाऊ गाणी प्रितीची घेऊन हात हाती।।
आहे सदा माझ्या सखे नाव तुझे ओठी।।२।।
आठवणीत तुझ्या मी राहतो दिन राती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।धृ।।
यल्लप्पा कोकणे
०८ नोव्हेंबर २०१८
Sunday, 19 August 2018
गणराज आला माझा
स्वागत करूया चला, गणराज आला माझा।।
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।धृ।।
पाहून रूप साजरे, आनंदी मन हे झाले
तुझ्याच भक्तीमध्ये, देवा भक्त सारे डोले
माझ्या लाडक्या बाप्पाचा, भारीच गाजा वाजा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।१।।
जीव वेडावला तुजसाठी, देवा काय आपली नाती
दर्शन घेतो मी तुझे रे, आज हाती घेऊन पंचारती
कृपा देवा तुझी आहे, झाला संसार सुखाचा माझा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।२।।
या रे या भक्तानो या रे, गीत बाप्पा चे गाऊ चला रे
आनंदी सोहळा पाहूया, गजरात ढोलाच्या नाचू चला रे
बाप्पा सेवेत तुझ्या आज, हरवून गेला देह माझा
आला आला आला, आला आला राजा माझा
दर्शन घेऊया चला, आला आला राजा माझा।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑगस्ट २०१८
Monday, 6 August 2018
जन्म का दिला
करी लाचार भुक फार, जन्म का दिला
देवा गुन्हा झाला काय, जन्म का दिला।।धृ।।
झोपते उपाशी हे लेकरू, आभाळ पांघरून
दगडाच्या काळजाचा तू, पाहतो डोळे मिटून
श्वास देऊन देहास या, आधार का दिला
देवा गुन्हा झाला काय, जन्म का दिला।।१।।
करीत संघर्ष जगतो, जगणे मुठीत घेऊन
खुशीत आहेस तू देवा, आम्हा जन्म देऊन
जगण्यास जीवन खोटा, मार्ग का दिला
देवा गुन्हा झाला काय, जन्म का दिला।।२।।
करी लाचार भुक फार, जन्म का दिला
देवा गुन्हा झाला काय, जन्म का दिला।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑगस्ट २०१८
Thursday, 1 March 2018
पाऊस पडतो रिमझिम
पाऊस पडतो रिमझिम, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।
साद घालतो वारा, शीळ घालून गातो
आहे लबाड वारा स्पर्शून तुजला जातो
छान पसरली नक्षी आकाशी, इंद्रधनु फेकतो रंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।१।।
केस ओले गालावरी, पसरली ओठावर लाली
तारूण्य करी घायाळ, ही काय जादू झाली
वेड्या जीवास राणी किती वेड लावशील सांग ।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।२।।
पाऊस पडतो ओलाचिंब, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।
– यल्लप्पा कोकणे
०१ मार्च २०१८
Thursday, 18 May 2017
निशा धुंद होते
ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा
निशा धुंद होते तुझ्या आठवांनी
कसे लोचने ही भिजे आसवांनी।।धृ।।
मिठी सैल होता दुरावा कशाला?
निशा धुंद होते पुरावा कशाला?
मला वेड लागे तुझ्या या खुणांनी।१।।
तुलाही कळेना मलाही कळेना
जगाया जिवाला निमित्ते मिळेना!
खुळा जीव होतो तुझ्या पैंजणांनी।।२।।
किती आठवू मी तुला रोज आता?
तुझा होत आहे कसा भास आता
दिली हाक तुला कसे स्वप्नांनी।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मे २०१७
Saturday, 10 December 2016
श्वासात गुंतलीस तु
श्वासात गुंतलीस तु, काळजात आहेस तु।।
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।धृ।।
स्वरात हरवले सुर, गीत तुझे गाताना
जगण्यास बळ येते, आठवणी तुझ्या जपताना
प्रत्येक क्षणात माझ्या, जगण्यात आहेस तु
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।१।।
भान हरवले आहे, स्वप्नात तु रंगताना
सावरू कसा जीव, आठवणींचे वार झेलताना
संपलेल्या आशेची सखे, सुरूवात आहेस तु
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।२।।
श्वासात गुंतलीस तु, काळजात आहेस तु।।
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २०१६
Tuesday, 6 December 2016
जीवन गाणे
जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।
होता अबोला दुःखाचा, शब्द फुटत नव्हते।।
काळीज चिरून सुर, कधीच जुळत नव्हते।।
सुर्यापरी तेज अंगी, आज संचारून गेले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।१।।
उजळून दाही दिशा, गेला पळून अंधार।।
नाही कोणी सोबती, फक्त आसवांचा आधार।।
दु:खाशी करून सामना, जगण्यास बळ आले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।२।।
जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑक्टोबर २०१६
Monday, 5 December 2016
जगणे मरणे सारे इथेच आहे
जगणे मरणे सारे इथेच आहे
तोलणे झेलणे दुःख इथेच आहे।।
जगणे मरणे सारे इथेच आहे।।धृ।।
तुझ्या हाती देवा आहे माझी दोरी
संभाळून घे मजला आलो तुझ्या दारी
करता करविता तुच ईश्वरा आहे
जगणे मरणे सारे इथेच आहेे।।१।।
वैतागला जीव विचारी प्रश्न आत्म्याला
नाही उरला अर्थ येथे आज जगण्याला
झिजलो दुसर्यांसाठी जगणे उणेच आहे
जगणे मरणे सारे इथेच आहे।।२।।
तोलणे झेलणे दुःख इथेच आहे।।
जगणे मरणे सारे इथेच आहे।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१६
तुजसाठी झुरतो सखे
तुजसाठी झुरतो सखे
तुजसाठी झुरतो सखे, वेड लागले मला।।
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।धृ।।
रूप तुझेच कैद, हृदयी माझ्या आहे
येताच अचानक तु, चोरून नजरा पाहे
तुझेच नाव ओठी, बदनाम वेडा झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।१।।
सैरभैर अधिर मन, नाही कशाचे भान
आठवणी शिवाय जीवन, जगत होतो छान
झोप उडाली आहे, बेचैन जीव झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।२।।
सदैव उघडे तुजसाठी, दार माझ्या मनाचे
भान नाही उरले, आता मला कोणाचे
ये फूंकून जा जखमा, हृदयावर वार झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।३।।
तुजसाठी झुरतो सखे, वेड लागले मला।।
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०१६
होते मनात माझ्या
होते मनात माझ्या, सांगायचे गेले राहून।।
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।धृ।।
होते मन मुक्त, स्वछंदी पाखरू गगनात
तुझेच वेड मनाला दिसे तुच स्वप्नात
दाटून आठवण येता, जातो श्वास थांबून
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।१।।
झुगारून दे जगाला, मिठीत ये साजणी
नको चिंता कोणाची, रमून जा यौवनी
मन माझे वेडावले राहते तुझ्यात गुंतुन
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।२।।
होते मनात माझ्या, सांगायचे गेले राहून।।
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१६
साथ हवी जगण्याला
साथ हवी जगण्याला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।धृ।।
विरल्या धुक्यात वाटा, धुंद झाल्या दिशा
भास तुझाच होतो, जडली प्रेमाची नशा
नाते आपले अतूट, सांगे ते दव पानाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।१।।
पदराशी खेळ करता, पाहसी रोखून नजरा
खिळवून ठेवतो मला, सुगंधी तुझा गजरा
समजावू किती,कसा, रात्री जागत्या स्वप्नाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।२।।
आठवण तूझी ओली,पावसाळी बरसून गेली
क्षणात मनी प्रितीची वीज चमकावून गेली
सुगंध लपल्या फुलांचा, मोहवून गेला मनाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।३।।
गंध मातीचा ओला, सांगे पाऊस पडून गेला
स्मरता रूप साजिरं, जीव हा वेडा झाला
सजवून ठेवतो मनी, त्या एक एक क्षणाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मार्च २०१६
वेड लावलं पोरीनं
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।धृ।।
चंद्राची आहेस कोर, जीवाला लावते घोर।।
पाहून तुला पोरी, नाचे मनी मोर।।
करून घायाळ मना, झुराया लावते जीवा।।
झोप उडाली माझी, तुझ्या दुडक्या चालीनं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।१।।
आहे माझा सुर तु, नको राहूस दूर दूर।।
भेटून जा तु प्रिये, लागली जीवा हुरहुर।।
करी हृदयावर घाव, सांग तुझा डाव।।
पहाते हळूच वळून, पदर चाचपून हातानं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।२।।
मेघ बरसे जोमात, हरवतेस टपोर्या थेंबात।।
जीव गुरफटतो माझाही, ओल्या चिंब कायात।।
भारावून गेलो क्षणात, भरलीस माझ्या मनात।।
विसरून गेलो दुनिया, मोहून टाकलं गजर्यानं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ नोव्हेंबर २०१५
होताच भास तुझा
होताच भास तुझा, छेडतो नवे तराने।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।धृ।।
रमतेस स्वप्नात येऊन, जातेस वेड लाऊन।।
धावते सैरभैर मन, भास तुझाच होऊन।।
मिठी अधीर झाली, सोड सारे बहाणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।1।।
का आहेस अजान तु, ओळखून घे मन तु।।
दे परतून प्रिये, चोरून घेतले प्राण तु।।
रोमा रोमात आहेस, तुच माझी साजणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।2।।
भिरभिरती तुझ्या नजरा, जीव होतो बावरा।।
भुलवून मज जातो, तुझ्या केसातील गजरा ।।
गातो तुझ्याच साठी, प्रेमाचे आज गाणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।3।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
01 नोव्हेंबर 2015
उजळून आले क्षण
आले एकामागून एक।
जीवनात सुख धावून।।
उजळून आले क्षण।
गेलो सुखात न्हाऊन ||धृ||
उल्हास दाटला चोहीकडे।
उजळल्या दाही दिशा।।
जगतो सुखात आता।
जडली वेगळीच नशा।।
नाही चिंता कोणाची।
घेतो मजेत जगून।।
उजळून आले क्षण।
गेलो सुखात न्हाऊन||1||
झुळझुळ नदिचे पाणी।।
गाती मधूर गाणी।
वाहतो मंद गारवा।।
सुमधूर सुर येई कानी।
धुंद करणारा निसर्ग।
क्षणात जातो भुलवून।।
उजळून आले क्षण।
गेलो सुखात न्हाऊन||2||
राहू दे असेच क्षण।
मागणे हेच आहे।।
जाऊ दे सुखात जीवन।
स्मरणे हेच आहे।।
आनंदी जगत असताना।
दु:ख जातो विसरून।।
उजळून आले क्षण।
गेलो सुखात न्हाऊन |||3||
यल्लप्पा सटवाजी कोकणे
28 ऑक्टोबर 2015
Sunday, 4 December 2016
आली ठुमकत नार लचकत
दिल हो गया वेड्यावानी
मेरी हो गई नजर दिवानी
कुछ कहती सुन मेरी राणी
दोस्तों देखो यह है दिवानी
कैसे चलती दुडक्या पावलानी
मान मुरडत हिरव्या रानी ||धृ||
मेेरे ओठों की प्यास है तू
मेरे दिलका इलाज है तू
हर सवाल का जवाब है तू
सपनों में आजा तू चोरपावलांनी
मान मुरडत हिरव्या रानी ||१||
आजा, भाव खाती है कायको
अमर बनायेंगे इस प्यार को
आजा चूपकेसे दिलमे बसनेको
तेरे प्यार मे देंगे हम कुरबानी
मान मुरडत हिरव्या रानी ||२||
करेंगे तुझको हम बायको
तुझ्या नादाने भूल गया सबको
आजा धावत थाम मेरे हातोको
ये गाऊ मिळून प्रेमाची गाणी
मान मुरडत हिरव्या रानी ||३||
२५ ऑक्टोबर २०१५
भेट झाली प्रियेची
आज खूप दिवसांनी।
भेट झाली प्रियेची।।
नजर झुकती होती।
साथ प्रेमळ मायेची ।।धृ।।
जवळ ती असताना।
राहतो थांबून श्वास।।
सुचत नाही काहीच।
तिचाच आहे ध्यास।।
हरवतो डोळ्यात तिच्या
पिऊन धुंदी गाण्याची
आज खूप दिवसांनी।
भेट झाली प्रियेची।।
नजर झुकती होती ।
साथ प्रेमळ मायेची।।१।।
राहिली सांज एकटी।
सुर्य उतरला खाली।।
पहाटेची वाट पाहत।
हसली रात्र गाली।।
चांदण्या टिपूर झाल्या।
शोभा वाढवी रात्रीची ।।
आज खूप दिवसांनी।
भेट झाली प्रियेची।।
नजर झुकती होती।
साथ प्रेमळ मायेची।।२।।
झुरतो मी तिच्याचसाठी।
समजेना काही मला।।
जीवन सूने सारे।
भासे तिच्यामुळे मला।।
बंदिवान झालो मी।
किमया तिच्या नजरेची।।
आज खूप दिवसांनी।
भेट झाली प्रियेची।।
नजर झुकती होती।
साथ प्रेमळ मायेची।।३।।
आज खूप दिवसांनी।
भेट झाली प्रियेची।।
नजर झुकती होती।
साथ प्रेमळ मायेची।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
25 ऑक्टोबर 2015
कोजागिरी च्या रात्री
खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा ||धृ||
आपल्या दोघांच्या भेटीची
साक्ष देती चांदण्या
जवळ मी असताना सखे
का तुझ्या झुकती पापण्या?
भासे तुझ्या मिठीत
स्वर्ग हा नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||1||
बदलले जीवन माझे
प्रथम तुज पाहता
विसरून सारे जातो
आठवणीत रात्री जागता
ये प्रिये कमी करू
दोघांमधील दूरावा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||2||
दाखवून देऊ जगाला
डाव आपल्या प्रितीचा
दे हात तुझा हाती
आनंद लुटू प्रेम गीताचा
जाऊन सामोरे जगाला
इतिहास रेखू नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||3||
खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा | | धृ | |
यल्लप्पा सटवाजी कोकणे
20 ऑक्टोबर 2015
कोजागिरी च्या रात्री
खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा ||धृ||
आपल्या दोघांच्या भेटीची
साक्ष देती चांदण्या
जवळ मी असताना सखे
का तुझ्या झुकती पापण्या?
भासे तुझ्या मिठीत
स्वर्ग हा नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||1||
बदलले जीवन माझे
प्रथम तुज पाहता
विसरून सारे जातो
आठवणीत रात्री जागता
ये प्रिये कमी करू
दोघांमधील दूरावा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||2||
दाखवून देऊ जगाला
डाव आपल्या प्रितीचा
दे हात तुझा हाती
आनंद लुटू प्रेम गीताचा
जाऊन सामोरे जगाला
इतिहास रेखू नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||3||
खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा | | धृ | |
यल्लप्पा सटवाजी कोकणे
20 ऑक्टोबर 2015