Friday, 16 October 2026

देवाच्या नावाखाली माणसाला घाबरवणं थांबवा!

देवाच्या नावाखाली माणसाला घाबरवणं थांबवा!

रूढी, परंपरा, व्रत-वैकल्यं या गोष्टींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा… प्रत्येक परंपरा ही माणसाने निर्माण केली आहे. सर्व गोष्टी माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी, स्वार्थासाठी आणि समाजावर प्रभाव निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या असू शकतात.

माणसाने निर्माण केलेल्या गोष्टींना जेव्हा देवाच्या नावाचं लेबल लावलं जातं, तेव्हा श्रद्धेचं रूपांतर भीतीमध्ये होऊ लागतं.

देवाच्या नावाने लोकांना घाबरवणारे काही लोक स्वतःचा स्वार्थ साधतात, मात्र त्याचा त्रास सामान्य माणसाला सहन करावा लागतो.

म्हणून प्रत्येक रूढी-परंपरेचा डोळसपणे विचार करून प्रश्न विचारा. सत्य समजून घ्या आणि विवेकाला महत्त्व द्या.

कारण…

माणसानेच निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये माणूसच देवाची भीती दाखवून माणसाला घाबरवत असेल, तर त्या भीतीतून बाहेर पडण्याचा मार्गही माणसाच्या विचारांतच आहे!

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१७ ऑक्टोबर २०२६

No comments:

Post a Comment