Friday, 25 July 2025

झाडावरची फुलं

झाडावरची फुलं झाडावर असताना फार सुंदर दिसतात. एकदा का ती झाडावरून गळून खाली पडली, की ती पायदळी तुडवली जातात. नातेसंबंधांचंही तसंच असतं. म्हणून माणसांनी नात्यांना घट्ट पकडून ठेवावं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ जुलै २०२५

Saturday, 12 July 2025

आपली माणसं

संकट आल्यावर जगाशी संपर्क तुटला होता. तेव्हा लक्षात आलं की आपण नेहमी ज्यांची विचारपूस करत होतो, त्यांनी आपली विचारपूससुद्धा केली नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ जुलै २०२५

Friday, 4 July 2025

कपटीपणा व खोटारडेपणा

तुम्ही जर खरे असाल, तर तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही. पण तुमच्या मनात कपटीपणा व खोटारडेपणा असेल, तर तुम्हाला भीतीच्या दडपणाखाली राहावे लागते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जुलै २०२५

Saturday, 28 June 2025

उसाचा चोथा

चोथा होईपर्यंत उसाचा रस काढला जातो, कारण शेवटच्या थेंबामध्येही त्याचा गोडवा टिकून असतो. माणसाचंही तसंच असतं — चांगल्या माणसांची गरज संपली की, त्यांची किंमत कमी होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जून २०२५

Monday, 23 June 2025

प्रवास मृत्यूच्या दिशेने

"अजूनही आपण जिवंत आहोत!" याच जाणीवेतून कदाचित जन्मदिवस / वाढदिवस साजरा केला जात असावा. तसं पाहिलं तर सर्वांनाच माहीत आहे की आपला प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू असतो.
 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जून २०२५

Friday, 20 June 2025

प्रेम म्हणजे लफडं

दोघांचं एकमेकांवर कितीही खरं प्रेम असलं तरी जगाला ते "लफडं" वाटतं! चांगलं काय आणि वाईट काय आहे? हे जगापेक्षा आपल्यालाच कळतं. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं.
 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०२५

Saturday, 14 June 2025

स्वतःमध्ये बदल

दुसऱ्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याचा बदला घ्यायचा नसतो. अशा वेळी त्याचा स्वभाव आपल्याला कळतो, म्हणून आपण स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ जून २०२५