Friday, 22 September 2023

विश्र्वास नांदतो

जिथे विश्वास नांदत असतो तेथे संशयाला जागा नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ सप्टेंबर २०२३

Monday, 11 September 2023

ज्ञानाची भर

इतरांकडून मिळवलेल्या ज्ञानात आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाची भर घालून ते सादर केल्यास आपल्याला लोकांच्या मनावर राज्य करण्याची संधी मिळते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ सप्टेंबर २०२३

Thursday, 3 August 2023

बापाचा स्पर्श

मुलाला जर कशाची भीती वाटत असेल तर बापाने मुद्दाम मुलाचा हात धरून मुलगा ज्या गोष्टीला घाबरतो त्याला तेथे घेऊन जावं.
कारण मुलाच्या मनात जन्मलेल्या भितीला मारण्याचं काम फक्त बापाचा स्पर्शच करू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ ऑगस्ट २०२३

Monday, 31 July 2023

बाप

बापाची जरी चाहूल लागली तरी मुलं मनातली भीती, संकटे विसरून जातात व आनंदाचं वातावरण निर्माण होऊन उत्सव साजरा केल्यासारखं वाटतं. कारण "बाप" या नावातच एक अद्भुत शक्ती आणि सकारात्मक उर्जा आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ जुलै २०२३

Tuesday, 25 July 2023

वायफळ खर्च

नोकरी करून किंवा एखादा व्यवसाय करून ईमानदारीने कमावलेले पैसे खर्च करताना हजार वेळा विचार केला जातो. हौसमौजसाठी पैसा खर्च करण्याचं धाडस अजिबात होत नाही. याउलट, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा हा व्यसन, वायफळ खर्च यावर होत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जुलै २०२३

Monday, 24 July 2023

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले
डुलवित शेतरान सारे
शेतकरी सारे खुशीत 
वाहती आनंदाचे वारे

पाणी वाहत चालले
चिंता गावाची वाढली
खचले डोंगर वस्तीवर
किती प्रेतं ही गाढली?

पाणी वाहत चालले 
गमवला जीव पुरात
गेला! माणूस वाहून 
राही आठवण उरात 

पाणी वाहत चालले
दिला पावसाने धोका
ठप्प होई जनजीवन 
चुके काळजाचा ठोका

पाणी वाहत चालले 
पाऊस हा माजलेला
असेलही तो कसाही
आहे नेहमी गाजलेला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जुलै २०२३

Wednesday, 12 July 2023

सुखाला मिठी

दुःखाची चाहूल लागल्यावर भोगत असलेल्या सुखाचा विसर पडायला लागतो. काळजी वाढायला लागते आणि समोर आलेल्या सुखाला मिठी मारायचं राहून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ जुलै २०२३