Friday, 31 December 2021

चांगुलपणा

नवीन ओळख किंवा जुनी नाती टिकून राहण्यासाठी आपला चांगुलपणाच कामी येतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ डिसेंबर २०२१

Wednesday, 29 December 2021

पेटलेली जिद्द

आपलं मन खंबीर आणि जिद्द पेटलेली असेल तर आपल्याला प्रत्येक चांगल्या कार्याचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ डिसेंबर २०२१

Tuesday, 28 December 2021

माणुसकी

जेथे माणुसकी नांदत असते तेथे दुःखाला मुळीच जागा नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२१

भावनिक जगणे

भावनिक जगणे

जमवलंय जेवढं आयुष्यात 
सोडून मागे सारे जाणे आहे
खर्चिले आयुष्य खऱ्यांसाठी
बाकी सारे खोटे नाणे आहे

जगण्यासाठी फक्त आपणास  
माया आणि प्रेम आधार आहे
आपलाच घेतात फायदा सारे 
इतरवेळी आपला भार आहे?

सोबत राहून सार्‍यांच्या नेहमी
जगणे आपले भावनिक झाले
जग सोडून गेल्यावर आपला
विसर पडणे स्वाभाविक झाले

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२१

Monday, 27 December 2021

शांतता

नाते बिघडल्यावर ते दुरूस्त करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपली स्वतःची शांतता आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ डिसेंबर २०२१

Saturday, 25 December 2021

जमिनीवर इमारती उगवल्या जात आहेत

जमिनीवर इमारती उगवल्या जात आहेत आणि त्याच इमारतीत गच्चीवर, खिडकीत एक छोटंसं रोपटं शोभेसाठी ठेवण्यात येत आहे.

वाह रे माणसा!

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ डिसेंबर २०२१

नवीन संधी

कालच्या दिवसाने दिलेली संधी नकळत आपल्या हातातून निसटून गेलेली होती. त्यासाठी राहीलेले प्रयत्न पुर्ण करण्यासाठी पुन्हा नवीन कल्पना घेऊन आजचा दिवस आपल्या मदतीला नवीन रूपात नवीन संधी घेऊन येत असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ डिसेंबर २०२१