Sunday, 30 May 2021

भान

भान

प्रेम करायला कधीही
काळ वय लागत नाही
लोकं काय म्हणतील?
याचं भान राहत नाही

सुरुवात होते नजरेने
घडायचं ते घडून जातं
काही शब्द न बोलता
मन का जडून जातं?

श्वासांचा पाठलाग होतो
जवळ दोघे असल्यावर
मनातलं मनातच राहतं
नजरेस नजर भिडल्यावर


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० मे २०२१

वृत्तपत्र

कितीही विचार केला तरी
व्हायचं तेच होणार आहे 
आज ज्ञान दिलेले वृत्तपत्र
उद्या रद्दीतच जाणार आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ मे २०२१

Sunday, 23 May 2021

छंद

आपल्या भरकटलेल्या, चंचल मनाला शांत करणारं जालीम उपाय म्हणजे आपला छंद आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ मे २०२१

Sunday, 16 May 2021

विश्वास

ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्याबद्दलही नेहमी प्रश्न निर्माण करत असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ मे २०२१

Sunday, 9 May 2021

विचारांचे युद्ध

जो माणूस वरून शांत दिसतो ती शांतता राखण्यासाठी त्याला त्याच्या मनात सुरू असलेल्या विचारांच्या युद्धाचा सामना करावा लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०२१

Sunday, 2 May 2021

छोटी रात्र

ध्येयास साथ माझी स्वप्नात रंगतो मी
वाटे भिती कशाची छोटीच रात्र आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०२१

Sunday, 25 April 2021

बाजार श्वासांचा

बाजार श्वासांचा

पैसे मोजावे लागतात हल्ली
एक एक श्वास घेण्यासाठी 
स्वतःच जबाबदार होतोय
आपण आपल्या मरणासाठी

नैसर्गिक गोष्टी संभाळण्यास
माणूस कमजोर ठरला आहे
नात्यांचा जीव वाचवण्यास
बाजार श्वासांचा भरला आहे

श्वासच हे अंतीम सत्य आहे 
देहास जिवंत ठेवण्यासाठी
महत्त्वाचा ठरतो प्राणवायू 
एक एक क्षण जगण्यासाठी  


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०२१