प्रत्येक क्षण जगताना चांगली वाईट ओढवलेली परिस्थिती हीच आपली गुरू असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जुलै २०१९
प्रत्येक क्षण जगताना चांगली वाईट ओढवलेली परिस्थिती हीच आपली गुरू असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जुलै २०१९
आपल्या मनात जर कमी विचार असतील तर त्यावर तोडगा लगेच सापडतो आणि जर मनात खूप विचार साठवून ठेवले असतील तर त्या विचारांचा पूर येतो व आपलं जगणं वाहून जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ जुलै २०१९
मनात आलेल्या एका विचारावर हजार वेळा विचार करणे हे कधीही हितकारक असतं. चांगले विचार हे चांगलेच असतात पण वाईट विचारांवर चांगला विचार केला तर सुरक्षित मार्गही सापडतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०१९
आपली ओळख वाढवून लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात आणि आपली ओळख कोणालाही कळू नये अशा विचारांची माणसं नेहमी चुकीच्या मार्गाने चालत असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जून २०१९
पाऊस
पावसाने या वेळी जरा
शहाणे होऊन वागावं
मेघांने त्याला सावकाश
कमी वेग ठेवून धाडावं
होणार नाही नुकसान
काळजी दोघांनीही घ्यावी
चांगली आठवण सर्वांच्या
हृदयी कायमची ठसावी
एवढंच तुम्ही लक्षात ठेवा
बाकी काही मागणं नाही
तू चांगला बरस रे पावसा
तुझ्याशिवाय जगणं नाही
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ जून २०१९
गर्भ श्रीमंत असणाऱ्याला
पैशाची भुक मोठी असते
पोट भरणाऱ्या गरीबाची
अपेक्षा फार छोटी असते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०१९
शेवटच्या श्वासाचा पाठलाग करत त्याला कैद करून ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आयुष्य जगणं होय.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ जून २०१९