त्रास होतो केव्हातरी फार
मनातल्या मनाला सावरताना
विचारांची शक्ती बंद होते
मनाचे मनोविचार जाणताना
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जुलै २०१८
त्रास होतो केव्हातरी फार
मनातल्या मनाला सावरताना
विचारांची शक्ती बंद होते
मनाचे मनोविचार जाणताना
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जुलै २०१८
अचानक वाईट परिस्थिती निर्माण झाली की मनाने खचून न जाता त्या परिस्थितीचं स्वागत करा कारण तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ती परिस्थिती सज्ज असते.
– यल्लप्पा कोकणे
परिस्थिती सव्वीस जुलै सारखी
नकोच पुन्हा कधी व्हायला
ठेवावेत नदी-नाले साफ नेहमी
प्रश्नच नाही पाणी तुंबायला!
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०१८
मला जे काही सांगायचं आहे
ते माझ्या नजरेत दाटलं आहे
तुझ्या नजरेची भाषा वाचून
मनातलं वादळ पेटलं आहे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जून २०१८
वृत्त :- पादाकुलक
मात्रा वृत्त
एका ओळीत
८+८ असे मात्रांचे दोन गट
हसण्याचे हे नाटक आहे
पण ओठांना जाचक आहे
किती वाईट नेता होता
किती चांगले स्मारक आहे
या विश्वाचा कवी लाडका
कुठेतरी संपादक आहे
काल मला हे दु:ख म्हणाले
"तुझे सोसणे काटक आहे"
ह्रदय म्हणाले तिला भेट जा
मी ही आज्ञाधारक आहे
:- प्रदीप निफाडकर
अभिमान आहे बोलतो मराठी
वाचतो मराठी ऐकतो मराठी
सेवा मराठीची करीत घडतो
हृदयात फक्त जपतो मराठी
माय मराठी माझी भाषा
सांगतो मी जगाला गर्वाने
आहे लाभले भाग्य मोठे
वाहते रक्तात तीच वेगाने
दिले झोकून स्वतःला आता
नांदते कवेत माझ्या मराठी
झाले संस्कार माझ्यावर सदा
रूजते कलेत माझ्या मराठी
अर्पितो तनमन मराठीस सारे
गर्व आहे मराठी असण्याचा
नसात भिनली मराठी आता
हर्ष आहे अस्मिता जपण्याचा
प्राण ओतून जपतो मराठी
श्वासात संचार करते मराठी
गोडवा मराठीचा गातो आहे
ध्यासात सदा राहते मराठी
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१८
होऊन सखी रात्र हल्ली
आठवण तुझी घेऊन येते,
"लाजून हासणे" आठवत
नकळत रात्र सरून जाते !
लगबग नजरेची सुरू होते
रोज चोरून तुला पाहण्याची,
हो, यात खरी गम्मत आहे
तुलाच आठवत जगण्याची
कळेल का माझी प्रित तुला?
कळेल का चाललेली धडपड?
यालाच म्हणावे का "प्रेम" सखे?
आठवणीतही असते धडधड !
करून प्रयत्न खुप झाले
सापडेना मार्ग भेटण्याचा,
वाट पाहतोय नजर पक्षी
प्रेम जाळ्यात फसण्याचा !
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०१८