Wednesday, 25 October 2017

प्रेरणादायी विचार

एखादी खोली जर खुप दिवसांपासून बंद असेल तर त्या खोलीत बरीच धुळ जमा होते आणि जर मनाची दरवाजे खुली ठेवून चांगल्या विचारांचे स्वागत केले तर प्रसन्न वाटते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ ऑक्टोबर २०१७

Sunday, 22 October 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा


हातून पालकांच्या संस्कार फार झाले?
पोरास जन्मदाते का आज भार झाले? 

कोणास काय बोलू माझाच दोष आहे
मरणे सुद्धा पहा ना घाईत फार झाले

सोडून एकटे मज दुःखात जे पळाले
माझ्या सुखात आता, ते भागिदार झाले

देतो कशास थारा गर्वास रोज आता
नाती तुटून गेली अन् बंद दार झाले

विश्वास खूप होता नात्यावरी म्हणोनी 
बहुदा असे हजारो पाठीत वार झाले

का? बाळगून आहे देहात राग तू रे
बघ शेवटी स्मशानी अंगार गार झाले

खर्चून जन्म माझा मी झेलले टिकांना
येताच वेळ माझी सारे फरार झाले


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०१८

Friday, 20 October 2017

स्मशान वाट

वाटली नाही भीती कधी
माणूस जिवंत असताना
थोडसं घाबरायला होतं
स्मशान वाट चालताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑक्टोबर २०१७

स्मशान वाट

वाटली नाही भीती कधी
माणूस जिवंत असताना
थोडसं घाबरायला होतं
स्मशान वाट चालताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑक्टोबर २०१७

Thursday, 19 October 2017

अविस्मरणीय भेट

माझ्यासाठी १९ ऑक्टोबर २०१७, लक्ष्मी पूजन, दिपावली हा एक अविस्मरणीय दिवस ठरला. मा. प्रदिप निफाडकर (मराठी गझलाकार) यांच्यामुळे आज माझी भेट मा. श्यामराव जोशी सर (संस्थापक ग्रंथसखा वाचनालय - बदलापूर) व मा. दिलीप म्हैसालकर सर (ग्रंथसहवासचे समन्वयक - नागपूर) यांची आज ग्रंथसखा वाचनालयात (बदलापूर) येथे भेट झाली.

आजच्या भेटीत जोशी सर व म्हैसाळकर सरांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले.

आजची ही अविस्मरणीय भेट मा. प्रदिप निफाडकर सरांमुळेच झाली. खुप खुप धन्यवाद सर.

(छायाचित्र : डावीकडून जोशी सर, म्हैसाळकर सर आणि मी)

#ग्रेटभेट #अविस्मरणीयभेट

यल्लप्पा सटवाजी कोकणे

Tuesday, 17 October 2017

माणसातलं माणूसपण

विचार

माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ ऑक्टोबर २०१७

Sunday, 15 October 2017

गझल

कोणास का कळेना आयुष्य राज आहे
दुःखातल्या छटांचा भारीच साज आहे

नाती कशी जपावी याचा विचार आहे 
शब्दात गोडवा हा याचा इलाज आहे

ती भेटण्यास आली तोडून बंध सारे
अंगी तिच्या शहारे डोळ्यात लाज आहे

मी वाचतो मराठी मी ऐकतो मराठी 
संचारली मराठी याचाच माज आहे

मी राहतो मुक्याने कोठेच बात नाही
आवाज हुंदक्याचा का शांत आज आहे