Monday, 5 December 2016

प्रेरणादायी विचार

स्वतःची चूक लपविण्यासाठी माणूस हा नेहमी प्रयत्न करीत असतो, पण त्याच प्रयत्नामध्ये व काहीजणांच्या दबावामुळे तो स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःबरोबर दुसर्‍याचेही नकळत नुकसान करतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ जानेवारी २०१६

कोणावर विश्वास ठेवू

कोणावर विश्वास ठेवू

कोणावर विश्वास ठेवू
मनातलं मनातच राहीलं।
काही सांगितलं स्वतःला
काही वहीतच राहीलं।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जानेवारी २०१६

अन्याय

अन्याय

पोळी भाजून घेतात घेणारे
गरीब तसाच उपाशी राहतो।
अन्याय होत असला तरी
नाईलाजाने तो सहन करतो।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जानेवारी २०१६

९८९२५६७२६४

नवागत प्रतिष्ठान NGO

"नवागत प्रतिष्ठान " या नावाची संस्था गरीब व अपंग मुलांसाठी धारावीत कार्यरत आहे. या संस्थेच्या संचालिका सुबीता नारायणकर (Subita Narayankar) यांच्या आग्रहाखातर ही चारोळी त्यांच्या प्रतिष्ठान करीता तयार केली आहे.

नवागत

नवीन पाहूण्याची होता ओळख जेव्हा
वाहून जातो आम्ही त्यांच्या सेवेत।
गत जन्माचे नाते जसे आमचे
तयांचे दुःख घेतो आमच्या कवेत।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जानेवारी २०१६

९८९२५६७२६४

घुसमट

घुसमट

जिकडे जावे तिकडे घुसमट
प्रत्येक ठिकाणी ताबा राजकारण्यांचा।
स्वतःची तिजोरी भरतात नेहमी
येथे जीव जातो सामान्यांचा।।

साखळी त्यांची आहे मोठी
टेबलाखालून पैसे घेणार्‍यांची।
मदत मागण्यास जाता कधी
झिजणे वाढवी जोड्यांची।।

कधी उगवणार सुर्य सत्याचा?
भ्रष्टाचार रूपी अंधार पळविण्यास।
पाठव देवा दूत भुतलावरती
गरीबांची सुटका अंधारातून करण्यास।।

वाढते जेव्हा घुसमटीचे राज्य
आधार घेतो नेहमी शब्दांचा।
कागदावर उतरवता व्यथा मनाची
वाचकांनाही दिसे अनुभव स्वतःचा।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ जानेवारी २०१६

आधार साहित्याचा

आधार साहित्याचा

जे कटु सत्य अनुभवले आहे
सांगता येत नाही दबावामुळे।
घेता साहित्याचा आधार जरासा
मन मोकळे होते शब्दामुळे।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जानेवारी २०१६

लाचखोर नेते

लाचखोर नेते

भुख कधीच भागत नाही
कहर झाला लाचखोर नेत्यांचा।
आ वासून उभे असतात
लूटण्यास पैसा जनतेच्या कष्टाचा।।

दमदाटी नेहमी चालत राहते
दबावाखाली आहे सामान्य जनता।
फार मोठा होई आनंद
गोरगरीबांचा पैसा लूटता।।

गोरगरीब ही शांत राहतात
करी सहन नेहमी अन्यायाला।
केला जरी विरोध याला
धोका असे विरोधकाच्या जीवाला।।

देवा, सांग कधी थांबेल
नेहमी चाललेली पिळवणूक आमची।
पाठव आता दूत असा
नरडी पकडण्यास लाचखोर नेत्यांची।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जानेवारी २०१६