Tuesday, 30 August 2016

पाऊस

अवनीला हिरवळीत नटवून कधी
पाऊस जातो मनाला सुखावून।।
पूर दुर्घटना घडता जेव्हा
हाच पाऊस जातो दुखावून।।१।।

शेतकऱ्यांच्या डोक्यावर सदा
असतो नेहमीच मायेचा हात।।
धोधो बरसून वैरासारखे कधी
हाच पाऊस करतो घात।।२।।

शाप आहे की वरदान
काय म्हणावे या पावसाला।।
पीक-पाणी कधी मृत्यूचे तांडव
अंदाज लागत नाही जगण्याला।।३।।

भय भलतेच मनाला वाटे
जीव मुठीत धरून जगताना।।
निसर्गासमोर पत्करली हार
पुरता हरलो निसर्ग समजताना।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ ऑगस्ट २०१६

Thursday, 4 August 2016

माझी मेट्रो

रोज धावणाऱ्या मुंबईला
माझी मेट्रो देते गती।
माझी मेट्रोमुळे मुंबईची
दिवसेंदिवस होते प्रगती॥

सर्वच मेट्रो कर्मचाऱ्यांचे
काम आहे लय भारी।
आणि त्यांच्याचमुळे मेट्रोची
शान आहे लय भारी॥

शिस्त आणि स्वच्छताचे
मेट्रो राखते नेहमी भान।
सलाम माझा त्यांना
जे जपतात मेट्रोची शान॥


यल्लप्पा सटवाजी कोकणे
26 जुलै 2016

Sunday, 24 July 2016

झोपेत पडलेलं स्वप्न नेहमी
धुक्यासारखे विरून जातात
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं
मनात जिद्द पेरून जातात


यल्लप्पा सटवाजी कोकणे

Monday, 6 June 2016

मन आपलेच वैरी
एकांतात साधतो मोका।।
नकोसे विचार मनात
चूकवी काळजाचा ठोका।।१।।

मन भयाण वादळ
कधी चंचल वारा।।
कधी तुफान पाऊस
कधी रिमझिम धारा।।२।।

मन कधी समजावणारे
कधी बेभान होणारे।।
ऐकणारे कधी आपले
कधी हाताबाहेर जाणारे।।३।।

मन म्हणजे वैरी,
कधी करतेे धोका।।
मन म्हणजे सखा
कधी देते मोका।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०१६


Monday, 30 May 2016

आभार सांगळे सर

१४ मे २०१६ रोजी माझा personal blog तयार झाला. रसिकांपर्यंत पोहचण्याची आणखी एक संधी मला मिळालीश्री. शिवाजी सांगळे सर, माझे गुरू यांच्यामुळे blog मार्फत रसिकांपर्यंत मला पोहचता येईल.

धन्यवाद सांगळे सर.......
गणपती बाप्पा मोरया