Monday, 5 January 2026

मी पणा

स्वतःहून आपल्या वाट्याला कोणीही येत नाही. पण जेव्हा आपला मीपणा आडवा येतो, तेव्हा आपल्याला खरं आणि खोटं यांची पारख करता येत नाही. मीपणा ज्याच्या अंगी असतो, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. मीपणामुळे समाजात कितीही इज्जत कमी झाली तरी त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, कारण मीपणामुळे तो विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असतो. मीपणा मिरवणारा माणूस जिवंत असला तरी तो समाजाच्या नजरेत कधीही येत नाही, कारण प्रत्येकजण त्याला नजरेआड करण्याचा प्रयत्न करत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०५ जानेवारी २०२६

Wednesday, 31 December 2025

विरोधक

प्रत्येक क्षेत्रात विरोधक असलेच पाहिजेत. ते आपल्याला नकळत अधिक हुशार आणि खंबीर करत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
३१ डिसेंबर २०२५

Thursday, 25 December 2025

परिस्थितीनुसार

परिस्थितीनुसार आपल्या हातून घडलेल्या चांगल्या कामाचं आपल्यालाच कौतुक वाटतं. पण आपण घेतलेल्या निर्णयामुळे किंवा केलेल्या कामामुळे जेव्हा नुकसान होतं, तेव्हा आपण दुसऱ्याला जबाबदार ठरवून मोकळे होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२५ डिसेंबर २०२५

Tuesday, 23 December 2025

मीपणा आणि स्वहितवृत्ती

बाहेर समाजात कितीही मान–सन्मान मिळत असला, तरी काही वेळा घरच्या व्यक्तींसमोर आपला मीपणा आणि स्वहितवृत्ती आड येते व मने दुखावली जातात; तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाला काहीच किंमत राहत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२३ डिसेंबर २०२५

Wednesday, 10 December 2025

मनाला मोकळीक

जिथे हक्काची माणसं असतात, तिथेच आपल्या मनाला मोकळीक मिळते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१० डिसेंबर २०२५

Wednesday, 3 December 2025

कामाचं नियोजन

एखादं काम पूर्ण करायचं ठरवलं की नियोजन सहज घडून येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०३ डिसेंबर २०२५

Monday, 1 December 2025

आपल्या भोळेपणाचा फायदा

आपल्या भोळेपणाचा फायदा घेतलेला आहे असं कळल्यावर वाईट वाटतं. त्यातूनच आपण माणूस ओळखलेला असतो, आणि हे भविष्यात तितकंच आपल्या फायद्याचं ठरतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०१ डिसेंबर २०२५