Monday, 4 November 2024

यशाची उंच भरारी

बालपणी चौकटीत राहून व पालकांच्या शिस्तीच्या धाकात जगलेली मुलं मोठे झाल्यावर यशाची उंच भरारी घेतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ नोव्हेंबर २०२४

माणसांची मनं

दिवस उगवतो आणि मावळतो. यात काहीही बदल होताना दिसत नाही आणि आपण म्हणतो खूप काही बदललं आहे. याचं कारण हेच की येथे "माणसांची मनं" फार बदलली आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ नोव्हेंबर २०२४

Saturday, 2 November 2024

वेळेचा फायदा

वेळ निघून गेली की त्या वेळेची किंमत कमी होते. पण त्या वेळेचा फायदा आपण करून घेतला तर आपली किंमत वाढते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ नोव्हेंबर २०२४

ज्वालामुखी

कधीच कोणाचा अंत पाहू नये. हिरवळीने नटलेल्या पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखी असतोच ना!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ नोव्हेंबर २०२४

Friday, 1 November 2024

मान सन्मान

फुलाने कधीच गर्व करू नये कारण फुलाला हातात घेण्याकरीता प्रथम देठाला स्पर्श करावा लागतो. म्हणून आपलं कतृत्व नेहमी मोठं ठेवा. मान सन्मान सहज मिळतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४

जीवाचा आटापिटा

ओरडून किंवा जीवाचा आटापिटा करून हक्क दाखवण्यापेक्षा गोड बोलून मन जिंकता आली पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४

आकर्षण आणि प्रेम

आकर्षण आणि प्रेम यात मोठं अंतर आहे. आकर्षण बेचैनी वाढवतो आणि प्रेम जगायला भाग पाडतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४