Monday, 14 October 2024

आत्महत्या

"आत्म" परिक्षण कमी पडले की कधी कधी स्वतःची "हत्या" करण्याची वेळ येते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑक्टोबर २०२४

Sunday, 13 October 2024

संयम

धीर जरी सुटत असला तरी संयम बाळगणे गरजेचे आहे कारण संयमात विजय खेचून आणण्याची ताकद असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑक्टोबर २०२४

Saturday, 12 October 2024

स्वतःचा विचार

स्वतःचा विचार केला की दुसऱ्यांची मनं दुखावली जातात आणि दुसऱ्यांचा विचार केला की स्वतःला आनंद मिळतो. 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ ऑक्टोबर २०२४

Friday, 11 October 2024

स्मशानातील शांतता

स्मशानातील शांतता

जाणारा माणूस निघून जातो
दहनभूमी येथे दुःख कशाला
वाणीत गोडवा नसे जिवंतपणी
मग शेवटी का कोरड घशाला?

स्मशानातील भयान शांततेला
आपलं दुःख जाऊन विचारावं
दोन अश्रू गाळण्या अगोदर थोडं
आपण कसे वागलो ते आठवावं

जीवाची धडपड कोणासाठी ही
सर्वच संपणार श्वास थांबल्यावर
ध्यास असावा फक्त माणूसकीचा
काय मिळेल माणूस गमावल्यावर?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ ऑक्टोबर २०२४

Tuesday, 8 October 2024

सतत कामात व्यस्त

लोखंड एका ठिकाणी पडून राहिल्याने त्यावर गंज चढतो. नदी थांबल्यावर ती गढूळ होते. म्हणून प्रगती करायची असेल तर सतत कामात व्यस्त असणे गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ ऑक्टोबर २०२४

Monday, 7 October 2024

दोन हृदय

जगताना दोन हृदय घेऊन जगावं लागतं. घराच्या बाहेरील जगात टिकण्यासाठी खंबीरपणा व घरातील आपल्या माणसांसाठी मवाळपणा घेऊन रहावं लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ ऑक्टोबर २०२४

Sunday, 6 October 2024

आपली वेळ

वेळ कोणासाठीही थांबलेली नाही. आपली वेळ आली की आपण सुरू व्हायचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ ऑक्टोबर २० २४