Saturday, 28 September 2024

त्रास होत असला तरी

त्रास होत असला तरी तो स्वीकारावा लागतो कारण त्यावेळच्या परिस्थितीला नाकारता येत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ सप्टेंबर २०२४

Thursday, 26 September 2024

स्वतः घडत असताना

स्वतः घडत असताना प्रतिस्पर्धी बिघडणार हे शंभर टक्के खरं आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ सप्टेंबर २०२४

स्वतःची ओळख

गरज पडल्यावर आपल्याला कोणीही ओळखत नाही म्हणून स्वतःची ओळख स्वतःच तयार करावी लागते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ सप्टेंबर २०२४

Monday, 23 September 2024

मवाळ आणि कडक

आपण स्वतः सुरक्षित राहण्यासाठी इतरांशी वागताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कधी मवाळ तर कधी कडक भूमिका घ्यावी लागते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ सप्टेंबर २०२४

Sunday, 22 September 2024

जीवनात आलेले प्रश्न

वाक्याच्या शेवटी आलेले प्रश्नचिन्ह हे चिंता वाढवून जातात आणि जीवनात आलेले प्रश्न हे आयुष्य घडवून जातात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ सप्टेंबर २०२४

Saturday, 21 September 2024

आईच्या उदरातून

आईच्या उदरातून घेतलेला जन्म हा शेवटी वेगवेगळ्या मार्गाने मृत्यूच्या दाढेत अडकला जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ सप्टेंबर २०२४

Wednesday, 18 September 2024

जगण्यातला जीवंतपणा

मनातली भिती मेल्यावर जगण्यातला जीवंतपणा जाणवू लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ सप्टेंबर २०२४