Saturday, 8 January 2022

ज्ञान प्राप्त करण्यासाठी

ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तक तर आहेतच पण त्याच बरोबर कान डोळे उघडे ठेवून जगात घडणाऱ्या गोष्टीलाही बारकाईनं पाहणं तेवढंच महत्वाचं आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०९ जानेवारी २०२२

Friday, 7 January 2022

आपल्याच जास्त कळतं

आपल्याच जास्त कळतं हा विचार मनातून कमी झाला की इतरांकडून आपल्याला खूप ज्ञान प्राप्त करून घेता येतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०८ जानेवारी २०२२

Thursday, 6 January 2022

निर्णय

"निर्णय" वेळेवर घेतल्यास आनंद आणि फायदा होतो आणि वेळे निघून गेल्यावर तोटा व मनस्ताप होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ जानेवारी २०२२

नवीन वर्षाचं स्वागत

नवीन वर्षाचं स्वागत करत असताना जो उत्साह, जल्लोष असतो तोच जर प्रत्येक दिवशी कायम राहत असेल तर दुःख आपल्याला स्पर्श करण्याची हिंमतच करणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ जानेवारी २०२२

Sunday, 2 January 2022

बाप माणूस

बाप माणूस 

मुलाच्या सुखासाठी धावताना
बाप माणूस कधी थांबत नाही
एकच अशी व्यक्ती आहे जी
स्वतःसाठी काही मागत नाही

तहान भूक आराम विसरून
गिळून दुःख जगत असतो
मुलांचे भविष्य घडवताना
बाप नेहमीच राबत असतो

कितीही अडथळे आले तरी 
स्वतःसाठी जगणं जमलं नाही
झिजतात चपला मुलांसाठीच
क्षणभरही थांबणं जमलं नाही

सलाम आहे बाप माणसाला 
हृदयी डोंगराएवढी माया आहे
जगाची चिंता जराही न करता
झिजणारी बापाची काया आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ जानेवारी २०२२

Saturday, 1 January 2022

जीवनाचा क्रम

वर्ष, महिने, दिवस व वेळ हे त्यांचा क्रम सुरूच ठेवतील पण आपण भूतकाळात न रमता वर्तमानात जगताना भविष्याचा विचार करत वाटचाल सुरू ठेवली की जीवनाचा क्रम सुखकारक होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२२

नवीन वर्ष

नवीन वर्ष 

महिना सण-वार तोच असतो
वर्ष नवीन रूप बदलत असतो
माणूस हा मानसिकता बदलून 
आपल्या परीने जगत असतो

आज सारखा उद्याचा दिवस 
सुर्य तोच, तोच वारा असतो
माणसं फक्त बदलतात नेहमी
आपण आपला सहारा असतो

सारे काही तेच ते असले तरी 
सारे सुखात राहो हीच इच्छा
मनापासून तुम्हा सर्वांना देतो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२२