मनातील विचार आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करीत असतात. त्यासाठी वाईट विचार मनात न आणता चांगला विचार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे स्वतःला व आपल्या माणसाला त्रास होत नाही.
आपल्याला त्रास होईल असे विचार करणे थांबवून चांगले विचार केल्यास शरीरात एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
आईच्या गर्भापासून ते अंत्ययात्रेपर्यंतचा प्रवास सुखकारक होण्यासाठी माणूसकी व आपूलकी लाभणे गरजेचे आहे. याची सुरुवात आपल्यापासून दुसर्यांसाठी होणे फार महत्त्वाचे आहे.