यल्लप्पा सटवाजी कोकणे
Friday, 9 April 2021
जगून थोडं पाहायचं आहे
मनाचे शब्द शांत ऐकून
जगून थोडं पाहायचं आहे
"नाही" हा शब्द विसरून
जगणं सारं जगायचं आहे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० एप्रिल २०२१
Saturday, 3 April 2021
हक्काची माणसं
घरापासून दूर गेल्यावर आपल्या माणसांची व घराची ओढ लागते तेव्हा समजून जायचं कि आपण हक्काची माणसं कमाविण्यास यशस्वी झालो आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ एप्रिल २०२१
Monday, 1 March 2021
आठवणी
आठवणी
नात्यांचं काय सांगावं कुणाला
आपली आपल्यावर रूसतात
एकटापणा असला कितीही
सोबतीला आठवणी असतात
आठवणी आणि माझं नातं
उपमा देऊ कशाची याला!
गळून पडे जीव जेव्हा कधी
नेहमी बळ मिळे जगण्याला
नजरेसमोर चेहरा हा असतो
सहवासातील क्षण आठवतात
सहवासातल्या आठवणीमुळे
दुरावे फार कमी जाणवतात
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१
प्रेमाचा अर्थ
"स्व" पणा गळून पडला की प्रेमाचा अर्थ समजण्यास सोपं होऊन जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१
प्रेम
"मी" पणा विसरून निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे "प्रेम" होय.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१
गोष्ट लपवणे
आपल्या माणासांपासून एखादी गोष्ट लपवणे म्हणजे आपण आपल्याच माणसांना घाबरलो आहे असे सिद्ध होतं
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१
भोळे मन
काळ्या रंगाच्या फळ्यावर कोणत्याही रंगाच्या खडूने लिहले तर ते आपल्या पर्यंत लगेच पोहचते पण माणसाच्या भोळ्या मनातील रंग लवकर कळत नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मार्च २०२१
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)