Wednesday, 25 March 2020

माणसातला माणूस

मंदिरातल्या देवापेक्षा माणसातला माणूसच संकट समयी मदत करण्यास धावून येतो.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ मार्च २०२०

Monday, 9 March 2020

स्वभावातील रंग

धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळताना सारे भेदभाव विसरून माणूस आनंदी असतो आणि इतरांनाही आनंद वाटतो. तोच माणूस इतर दिवशी आपले स्वभावातील रंग दाखवून इतरांना दुःखी करण्याचं काम करत असतो.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० मार्च २०२०

Saturday, 29 February 2020

डोळ्यांची भाषा

डोळ्यांची भाषा ज्याला वाचता येते ती व्यक्ती नातं जपण्याच्या परीक्षेत पास होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ फेब्रुवारी २०२०

Saturday, 1 February 2020

आपली वेळ

स्वतःला वेळ दिला किंवा स्वतःसाठी वेळ राखून ठेवला कि, इतरांना भेटायला, संवाद साधायला वेळ मिळतो. आपली वेळ सर्वांना देणंही शक्य होतं. 

Sunday, 26 January 2020

जेव्हा लढाईचा खरा डंका

जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला

माझा अखेरीचा अता घेऊ कसा हा घोट मी
हातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला

ह्या पांगळ्या पायांसवे मी चाललो होतो जरी
बेमान आयुष्या अता रस्ता अडाया लागला

गेला वधस्तंभाकडे कैदी सुखाने शेवटी
ज्याने दिली होती सजा तो आवडाया लागला

त्याला न आले बोलता आजन्म ज्याने सोसले
ज्याला हवे ते लाभले तो ओरडाया लागला

वाया न गेले शेवटी जे रक्त माझे सांडले
माझा जुना मारेकरी आता रडाया लागला

सुरेश भट

Sunday, 19 January 2020

कवी

कवी

दुनिया झोपली गाढ सारी
कवी रात्री कशाला जागतो?
अंधार खोलीत एकटा बसून
जगाच्या तो भावना मांडतो

माणसांची गर्दी आहे तरी
कवी जातो शब्दात हरवून 
एकटा लिहीत असला तरी
शब्दात घेतो जग सामावून 

अक्षरांचा प्रवास हा नेहमी
थांबतो कोऱ्या कागदावर
मनात दाटलेलं मांडताना
राज्य करतो कवी शब्दांवर 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१९ जानेवारी २०२०

Friday, 3 January 2020

माणूसकी

पैशाच्या मागे धावत असताना नात्याच्या वळणावर थोडं थांबून आपल्या माणसांत रमून जो माणूसकी कमवतो तोच खरा श्रीमंत माणूस असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ डिसेंबर २०१९