Thursday, 24 October 2019

निवडणूक

निवडणूक

संपली आता निवडणूक 
संपली सारी आश्वासने 
फिरकणार नाही नेता
सांगतो मी विश्वासाने

हक्काने केलं मतदान
बदल घडवायचा होता
नव्याने लुबाडण्यासाठी
तयार आहे आमचा नेता

गरीबी, बेरोजगार, लाचारी
यात तरूण गुरफटलेला
पैशाच्या मागे धावताना
दिसतो नेता भरकटलेला

शेवटी जैसे थे परिस्थिती
असणार तशीच कायम
स्वतःची झोळी भरण्यासाठी
आता नेते काढतील नियम

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ ऑक्टोबर २०१९

Sunday, 20 October 2019

अबोला

अबोला

काहीही संवाद नसला तरी
भाव मनीचे कळून येतात
तू कितीही अबोला धरला
डोळे तुझे बोलून जातात

सुरू असते धडधड मनात
प्रेम व्यक्त करत असताना
कधी गरज नसते सांगायची
भावना या कळत असताना

समोर जेव्हा असताना तू
वाढत जातो वेग श्वासांचा
आणि तू जवळ नसतात
खेळ सुरू होतो भासांचा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑक्टोबर २०१९

Friday, 4 October 2019

परिस्थितीचे रंग

आपल्यावर ओढवलेली परिस्थिती जो रंग उधळेल त्या रंगात मिसळून जगायचं असतं. परिस्थितीने उधळलेल्या रंगातून आवडीचे रंग निवडून ते जीवनात भरले की प्रसन्न वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ ऑक्टोबर २०१९

Sunday, 29 September 2019

विचारांची गर्दी

घुसमट नको विचारांची
मनातलं सारं बोलून घे
घातक आहे विचार गर्दी
वाद आता मिटवून घे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९

मनात साचलेलं

मनात साचलेलं सारं काही
थांबवलं आहे सध्या लिहणं
शिकतो आहे आजकाल मी
तिच्या विचारांशिवाय जगणं

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९

Wednesday, 11 September 2019

शुन्य

शुन्य जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. जर तो एखाद्या अंकाच्या शेवटी जाऊन बसतो तेव्हा शुन्याची व त्या अंकाची किंमत वाढते. माणसांनी देखील नेहमी शुन्यासारखं वागावं. माणसांनी माणसांच्या मागे खंबीरपणे उभं रहावं. त्यामुळे स्वतःबरोबर दुसऱ्याचीही किंमत वाढते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ सप्टेंबर २०१९

Monday, 2 September 2019

गणपती आगमन

यंदाही आगमन झाले बाप्पाचे।
यावे पाहण्यास रूप देखणे।।
वाट पाहतो आहे आम्ही तुमची।
स्वागतास उभे परिवार कोकणे।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ सप्टेंबर २०१९